Shirur Lok Sabha | शिरुरमध्येही ‘तुतारी’ चिन्हावरुन गोंधळ, निवडणूक आयोगाचे चुकीचे भाषांतर संभ्रमात टाकणारे, अमोल कोल्हेंची वाढणार चिंता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shirur Lok Sabha | तुतारी (Tutari) वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगानेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षाला दिले आहे. मात्र, आता आयोगच अन्य अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट या वाद्याचे चिन्ह देऊन त्यांचे भाषांतर तुतारी म्हणून नमूद करत असल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. बारामतीमध्ये सुद्धा अशाप्रकारे घोळ घातल्यानंतर आता शिरूरमध्ये आणखी एका अपक्ष उमेदवाराला तुतारी लिहिलेले चिन्ह दिले आहे. तर येथील शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचेही चिन्ह तुतारी असल्याने कोल्हेंची चिंता वाढणार आहे.(Shirur Lok Sabha)

शिरुर लोकसभेतचे अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचेही चिन्ह तुतारी आहे. चित्रामध्ये वाद्य वेगवेगळी दिसत असली तरी निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्हांना तुतारी असे नाव दिले आहे. याचा फटका शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना बसू शकतो.

बारामतीमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला असल्याने शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना ते अडचणीचे ठरू शकते.
दरम्यान, ट्रम्पेट चिन्हाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसणार का ? हे चार जूनच्या निकालातून स्पष्ट होईल.

शिरूरमध्ये तुतारी हे चिन्ह मिळालेले मनोहर वाडेकर यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाकडे मी तुतारी हे चिन्ह मागितले होते,
त्यानुसार ते मला मिळाले आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह आहे.
या चिन्हामध्ये मतदाराची दिशाभूल होणार नाही. परंतु या चिन्हाचा माझ्या उमेदवारीवर फरक पडू शकतो.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. ते सुद्धा सुप्रिया सुळेंप्रमाणे निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi Sabha In Pune | काँग्रेस संविधानाचा अपमान करतेय, कर्नाटकात एका रात्रीत सर्व मुस्लिमांना ओबीसी केले, पीएम मोदींचा घणाघात

Punit Balan Group (PBG) – Constitution Park Pune | लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान !