Shirur Lok Sabha Election 2024 | शिरूर मतदारसंघात अजित पवारांना धक्का, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे नाराज, साथ सोडणार?

पिंपरी : Shirur Lok Sabha Election 2024 | शिंदेंच्या शिवसेनेतील (Eknath Shinde Shivsena) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन अजित पवार यांनी शिरूरमधून उमेदवारी दिली आहे. यामुळे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) नाराज झाले आहेत. ते अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी (Sharad Pawar NCP) जाणार, अशी चर्चा आहे. जर लांडे यांनी साथ सोडली तर शिरूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसू शकतो. लांडे यांच्याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील संकेत दिले आहेत.(Shirur Lok Sabha Election 2024)

विलास लांडे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढवण्यास इच्छूक होते. आढळराव पाटीलांसारख्या आयात केलेल्या नेत्याला उमेदवारी देऊ नये, असे म्हणत त्यांनी विरोध केला होता. पण त्यांचा विरोध डावलून आढळरावांना अजित पवारांनी पक्षात घेऊन उमेदवारी दिली. यामुळे लांडे हे नाराज आहेत.

भोसरी येथे प्रचारासाठी आले असताना शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लांडे यांच्याबाबत वक्तव्य
केले आहे. ते म्हणाले, महाराजांची शिकवण आहे की मोहीम फत्ते झाल्यानंतर निकाल दिसला पाहिजे,
मोहिमेची वाच्यता नको, असे म्हणत त्यांनी लांडे हे संपर्कात असल्याचे संकेत दिले.
त्यामुळे लांडे हे शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास