Lockdown काळात जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर शिरुर पोलिसांकडून कारवाई; 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

शिक्रापुर : लॉकडाऊन काळात सर्वत्र कडक नियमांची अमंलबजावणी सुरू असताना शासनाच्या नियमांची पायमल्ली करून जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर शिरूर पोलीसांनी धडक कारवाई करत नऊ जणांना अटक केली असून १ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी दिली.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार कोरोना संकटामुळे जिल्हाधिकारी यांचे संचारबंदीचे आदेश जिल्हयामध्ये लागू असतानाही तसेच लॉकडाऊन काळात विना मास्क एकत्रित येत काही व्यक्ती जुगार खेळत अल्स्याची माहिती शिरूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तांदळी गावामध्ये घोडनदी पात्रालगत जून्या स्मशानभूमी जवळ अचानक छापा टाकला. यावेळी आरोपी गणेश गायकवाड हा काष्टी (ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर) च्या दिशेने पळून गेला.तर सदर ठिकाणी गोपीनाथ बबन गायकवाड,प्रकाश विलास डोईफोडे,नूरमूहम्मद जिम्मूभाई सय्यद (सर्व रा.काष्टी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर), सुभाष एकनाथ खोरे,बाबूलाल याकूब शेख,शामल राजाराम गोवर्धन,निलेश हरीश्चंद्र बल्लाळ,गणेश दत्तू रासकर,राजू गूलाब गायकवाड, (रा.सर्व रा.तांदळी ता.शिरूर जि.पुणे) हे जुगार खेळताना आढळून आले.

याप्रकरणी पोलिसांनी दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सुमारे १ लाख ४४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,पोलिस शिपाई गोरे,पोलिस कॉन्स्टेबल विशाल कोथळकर,होमगार्ड धर्मा खराडे,होम गार्ड शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.