Shisvena Uddhav Thackeray – Raj Thackeray | धोका लक्षात घ्या, ते ‘इंजिन आणि डबे’ गुजरातला वळवतील, उद्धव ठाकरे यांनी भाजपाबाबत राज ठाकरे यांना दिला सूचक इशारा

मुंबई : Shisvena Uddhav Thackeray – Raj Thackeray | मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) गुजरातला गेल्याचे खापर आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडले. काय तर म्हणे, या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल. हे महाशय गेले दोनेक वर्षे त्याच सरकारचे महत्त्वाचे मंत्री होते. त्यावेळी फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे दोन वर्षे व्यस्त होते का? असा सवाल करत शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडले आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून वेदांत-फॉक्सकॉनवरून शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. (Shisvena Uddhav Thackeray – Raj Thackeray)

सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, कोणत्याही कॅबिनेट बैठकीत या प्रकल्पाविषयी दिरंगाई होत असल्याविषयी त्यांनी तोंडातून ‘ब्र’ काढल्याची नोंद नाही. फडणवीसांच्या काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून उचलून गुजरातच्या हवाली केले तसे मुख्यमंत्री शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या हातावर उदक सोडावे तसा सोडला. उद्या हे याच पद्धतीने मुंबईचादेखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत. फॉक्सकॉन ही तर सुरुवात आहे. (Shisvena Uddhav Thackeray – Raj Thackeray)

अग्रलेखात म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले. तुमच्या आमदारांना पाच-सहाशे खोके दिले.
त्या बदल्यात मुंबई-महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती द्या, असा हा सरळ सरळ सौदा दिसतो.

दरम्यान, सामनाच्या या अग्रलेखात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल चिंता व्यक्त
केल्याबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले आहे की, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला
गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले. पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा
रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपावालेच आहेत.

राज ठाकरे यांना सूचक इशारा करताना अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे.
काही दिवसांपूर्वीच राज यांनी पत्रकारांशी विदर्भ दौर्‍यासंदर्भात संवाद साधला.
यावेळी रेल्वे प्रवासाच्या संदर्भात सूचक विधान करताना ‘अजून डबे जोडण्याचे काम सुरु आहे, असे म्हटले होते.
याच इंजिन आणि डब्यांच्या संदर्भातून शिवसेनेने राज यांना इशारा दिला आहे.

दरम्यान, शिंदे गट, मनसे यांच्या मदतीने मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत.
भाजपा नेते यासाठी राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावरूनच शिवसेनेने मनसेला भाजपासंदर्भात इशारा दिला आहे.

Web Title :- Shisvena Uddhav Thackeray – Raj Thackeray | shivsena mention raj thackeray warns him about bjp over vedanta foxconn project issue

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | पुणेकर पोलिस सुद्धा ‘जगात भारी’; बदली झालेल्या साहेबाला दिल्या ‘पुणेरी स्टाईल’ने शुभेच्छा, व्हॉट्सअ‍ॅप झाला व्हायरल

Vedanta Foxconn Project | वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा; म्हणाले – ‘तो प्रकल्प परत आणा…’

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांची भाजप महाराष्ट्रच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती