विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून शिवसेनेला ‘हे’ मोठं ‘गिफ्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रीपदे दिल्यानंतर आता भाजप विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला खुश ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. आता विधानपरिषदेच्या उपसभापतिपदासाठी भाजप निवडणूक घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उपसभापती पद हे रिक्त असून या पदावर निवडणूक व्हावी. यासाठी भाजपा आणि शिवसेना आग्रही आहे. जर या पदासाठी निवडणूक घेण्याचा निर्णय झाला तर हे पद शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकते. किंबहुना भाजप त्यांना हि जागा सोडू शकतो.

शिवसेनेच्या आजच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत. शिवसैनिकांना मार्गदर्शन देखील ते यावेळी करणार आहे. शिवसेना आणि भाजप विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रामराजे शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगू लागल्या असताना त्यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप या पदासाठी निवडणूक घेते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, विधानपरिषदेत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुमत असून शिवसेना आणि भाजप उपाध्यक्ष पदावर दावा सांगू शकतात. मात्र या सगळ्यात जर महायुतीने रामराजेंवर अविश्वास ठराव दाखल केला तर त्यांचे पद धोक्यात येऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन