Shiv Sena MLA Vaibhav Naik | शिवसेनेच्या आमदारानं दिला मोफत पेट्रोलसाठी नारायण राणेंच्या पेट्रोल पंपाचा पत्ता, अन्…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP)आणि शिवसेना (shiv sena) यांच्यात वारंवार आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. अनेक मुद्यावरून जोरदार टीकाटिपणी होताना पाहायला मिळते. आज (19 जून) शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनानिमित्त शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Shiv Sena MLA Vaibhav Naik) यांनी स्वस्त दरामध्ये पेट्रोल (Petrol) वाटपाची घोषणा करत कार्यक्रम जाहीर केला होता. तर सर्वसामान्यांसाठी पेट्रोल (Petrol) 100 रुपयांमध्ये 2 लीटर आणि भाजपचे सदस्यत्व ओळखपत्र दाखवणाऱ्याना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोल (Petrol) मोफत अशी घोषणा केली होती. याबाबत ट्विट नाईक (MLA vaibhav naik) यांनी केलं यांनी केलं होतं. मुख्यतः म्हणजे भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर हे पेट्रोल (Petrol) वाटप करण्यात येणार होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एक डिवचण्याचा कार्यक्रमच शिवसेना आमदार वैभव नाईक (MLA vaibhav naik) यांनी आयोजित केला होता.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

शिवसेना नेते आमदार वैभव नाईक (MLA vaibhav naik) यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन भाजपला टोचण्याचा कार्यक्रम आखला होता.
तोच कार्यक्रम आता उलटताना दिसत आहे. आमदार वैभव नाईक (MLA vaibhav naik) यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली तो कुडाळ येथील भारत पेट्रोल पंप होता.
मात्र तेथील व्यवस्थापनानं नाईक (MLA vaibhav naik) यांच्या अशा कार्यक्रमाबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
म्हणून नाईक यांना पेट्रोल पंपावरील नियोजित कार्यक्रम करता आला नाही.
यानंतर वैभव नाईक (MLA vaibhav naik) यांनी दुसऱ्या पेट्रोल पंपावर स्वस्त दरात पेट्रोल वाटपाचा निर्णय घेतला,
त्यावेळी त्या पेट्रोल पंप व्यवस्थापनांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तसेच, पेट्रोल-डिझेल वाटपात आम्हाला कुठलाही राजकीय अभिनिवेश ठेवायचा नसल्याचं पेट्रोल पंप मालकांनी सांगितलं आहे.
म्हणून, आमदार वैभव नाईक (MLA vaibhav naik) यांचे भाजपला टोचण्याचे एक वेगळे आंदोलन, कार्यक्रम झाला नाहीच.

PM Jan Dhan Account | जर अजूनपर्यंत उघडले नसेल जनधन खाते तर आजच उघडा, मिळेल 1.30 लाखाचा फायदा

आमदार वैभव नाईक (MLA vaibhav naik) यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा कणकवली, वागदेमध्ये पेट्रोल पंप आहे.
मात्र, नाईक (MLA vaibhav naik) हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडून आले आहेत.
तो मतदारसंघ नारायण राणेंचा (Narayan Rane)आहे. वैभव नाईकांचा (MLA vaibhav naik) पेट्रोल पंप त्यांच्या मतदारसंघात नसल्याने राजकीय उद्देशासाठी त्याचा ते वापर करू शकत नाहीत.
तो पेट्रोल पंप नारायण राणेंचे (Narayan Rane) पूत्र आमदार नितेश राणेंच्या (Nitesh Rane) मतदारसंघात आहे.
मालवण शहरामध्ये एकच पेट्रोल पंप आहे, तोही राणेंच्याच (Narayan Rane) मालकीचा आहे.
म्हणून आता वैभव नाईकांना (MLA vaibhav naik) त्यांनी नियोजित केलेलं आंदोलन आता वाया जाऊ द्यायचे नसतील तर कुडाळ शहराबाहेरील पेट्रोल पंपांचा आधार त्यांना घ्यावा लागणार आहे.
मात्र, हे हा पेट्रोल पंप लांब असल्याने त्यामुळं एक पेच निर्माण झाला आहे.

काय म्हणाले होते आमदार नाईक ?
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली.
त्यानुसार सर्वसामान्यांना कुडाळ येथील भारत पेट्रोल पंपावर 100 रुपयांत 2 लीटर पेट्रोल (Petrol) (प्रति वाहन) आणि भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोल (Petrol) मोफत दिलं जाणार असल्याचं नमूद केलं होतं.
हा कार्यक्रम आज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे वाटप होणार होतं.
असं आमदार वैभव नाईक (MLA vaibhav naik) यांनी ट्विटद्वारे सांगितलं होतं.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : shiv sena mla vaibhav naik gave narayan ranes petrol pump address free petrol but something happen different

हे देखील वाचा

 

Black Money | मोदींंच्या काळात स्वीस बँकेत भारतातून 286 % जास्त रक्कम जमा; काळ्या पैशांचा मुद्दा पुन्हा चर्चेत