Shiv Sena Shakha In Containers | कंटेनर शाखांमुळे ठाण्यात वाद उफाळण्याची शक्यता, ठाकरेंना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंची नवी खेळी

ठाणे : Shiv Sena Shakha In Containers | शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या शिवसैनिकांमध्ये सातत्याने वाद होण्याची प्रकार घडत आहेत. त्यातच जुन्या शाखांवर हक्क कोणाचा हा सुद्धा कळीचा मुद्दा बनला आहे. यावर ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवी खेळी करत जुन्या शाखा बेकायदेशीर ठरवत कारवाई सुरू करायची आणि ठिकठिकाणी कंटेनरमधील आपल्या शाखा (Shiv Sena Shakha In Containers) स्थापन करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, कंटेरनमधील या शाखांवरून ठाण्यात वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

मुंब्रा येथील शाखेचा वाद टोकाला पोहोचल्याने शिंदे गटाच्या (Shinde Group) राजन किणे यांनी या ठिकाणी शाखेच्या पुनर्बांधणीचे काम होईपर्यंत कंटेनर शाखा रस्त्याच्या कडेला सुरू केली आहे. याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या कंटेनर शाखेवर पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने शिवाईनगर येथील मुख्य चौकात टीएमटी बस थांब्याशेजारीच शिंदे गटाने ९ नोव्हेंबर रोजी नवीन कंटेनर शाखेचे उद्घाटन केले.

आठ फूट रुंद व चौदा फूट लांब कंटेनर शाखा पदपथावरच असल्याने पादचाऱ्यांना त्रास होत आहे. शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. (Shiv Sena Shakha In Containers)

ठाण्यात रस्ता रुंदीकरणानंतर कळवा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर पालिका प्रशासनाने कारवाई केली असता, याठिकाणी कंटेनरमध्ये शाखा सुरू केल्या आहेत. आश्चर्य म्हणजे शिवाईनगर येथील शाखा नेमकी कोणाच्या परवानगीने याठिकाणी बसवली, त्याची माहिती घेतली जात असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी याबाबत म्हटले की, शाखांवरून दोन्ही गटांत होणारे
वाद टाळण्यासाठी ही सामंजस्याची भूमिका घेतली आहे. भविष्यात शिवसैनिकांची ज्या ठिकाणी मागणी असेल,
त्या ठिकाणी कंटेनर शाखा उपलब्ध करून दिल्या जातील. या शाखेचे कोणतेही पक्के बांधकाम केलेले नाही.
त्या आवश्यकतेनुसार इतर ठिकाणी स्थलांतरित करता येतील.

तर ठाकरे गटाचे ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्र उपशहरप्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी म्हटले की, शिवाईनगर येथील
शिवसेनेच्या ३० वर्षे जुन्या शाखेबाबत शिंदे गटाने नाहक वाद उकरून काढल्यानंतर पोलिसांनी ६ मार्च २०२३ रोजी टाळे ठोकले.

आता समोरील गटाने त्यांची वेगळी चूल मांडत कंटेनर शाखा सुरू केल्यास याप्रश्नी स्थानिक वर्तकनगर पोलिसांना निवेदन देत
शिवाईनगर येथील शिवसेनेच्या मूळ शाखेचे टाळे काढण्यासाठी निवेदन आमच्याकडून दिले जात आहे.

त्याला विरोध झाल्यास उग्र आंदोलन केले जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त