Mumbai News : पेट्रोल-डिझेल भाववाढीविरोधात शिवसेना उतरली रस्त्यावर

पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम उपनगरात आज दुपारी पेट्रोल डिझेल वाढीविरोधात गोरेगाव, बोरिवली स्टेशनच्या बाहेर शिवसेनेकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पेट्रोल-डिझेलची विक्रमी भाव वाढ करणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी पश्चिम उपनगरात शिवसेना आज रस्त्यावर उतरली होती. दरम्यान, शिवसेना नेते व उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रमोद, आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू व महिला विधानसभा संघटक व ज्येष्ठ नगरसेविका साधना माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विभाग क्रमांक ०३ तर्फे जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजीने गोरेगाव स्टेशन परिसर दणाणून गेला होता.

यावेळी उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, नगरसेवक बाळा नर, तुळशीराम शिंदे, स्वप्नील टेंबवलकर, आत्माराम चाचे, विनया सावंत, रेखा रामवंशी, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, विष्णू सावंत, राजू पाध्ये , प्रशांत कदम, महिला विधानसभा संघटक पूजा चौहान, रीना सुर्वे , शालिनी सावंत, स्नेहा गोलतकर, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, शाखा संघटक, उपशाखाप्रमुख गटप्रमुख, शिवसेना पदाधिकारी,भाविसे, ग्राहक संरक्षण कक्ष सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

तसंच शिवसेना विभाग क्रमांक १ तर्फे बोरवली स्थानक पूर्व येथे केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या पेट्रोल व डिझेल घरगुती गॅसच्या महागाई विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी विभाग प्रमुख व आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, मागाठाणे विधानसभा प्रमुख उद्देश पाटेकर, शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता पाटेकर ,नगरसेवक संजय घाडी, बाळकृष्ण ब्रीद, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, शीतल म्हात्रे, रिद्धी खुरसंगे, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे , दामोदर म्हात्रे , पांडुरंग देसाई , चेतन कदम, सुनील डहाळे, महिला उपविभाग संघटक शकुंतला शेलार, अश्विनी सावंत, वंदना खाडे, मीना पायबंद, मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, विभागातील सर्व पुरुष व महिला शाखाप्रमुख शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.