Shiv Thakare | मराठी चित्रपट न करण्याबद्दल शिव ठाकरेचे वक्त्यव्य; म्हणाला – ‘काही चित्रपटांसाठी माझी निवड…’

पोलीसनामा ऑनलाइन : Shiv Thakare | गेल्या अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यावर लोकप्रिय मानला जाणारा शो बिग बॉसचे स्पर्धक चर्चेत होते. त्यातच मराठमोळा शिव ठाकरे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. शिव आजवर ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ आणि बिग बॉस हिंदी अशा कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. आतापर्यंत शिवने एकही चित्रपट किंवा मालिकांमध्ये का दिसला नाही यावर त्यांनी नुकताच भाष्य केले आहे. (Shiv Thakare)

बिग बॉस हिंदी मुळे शिव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यंदाचा पर्व शिव ठाकरे जिंकावा अशी सर्वांनची इच्छा होती. शिवने एका मुलाखतीत बिग बॉसच्या घराबद्दल, मंडळी बद्दल आणि इतर विषयांवर ही भाष्य केले आहे. तर यावेळी शिवने लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचे देखील म्हटले आहे. (Shiv Thakare)

या मुलाखतीमध्ये शिवला बिग बॉस मराठी नंतर तू रुपेरी पडद्यावर यावं अशी चाहत्यांची इच्छा होती पण तू एकाही मोठ्या प्रोजेक्ट मध्ये दिसला नाहीस या मागचे कारण काय? असं त्याला विचारण्यात आले होते.
यावेळी बोलताना शिव म्हणाला, “माझी मराठी चित्रपटांसाठी अनेकदा विचारना झाली होती.
काही चित्रपटांसाठी माझी निवड देखील झाली होती. तारखा देखील निश्चित झाल्या होत्या.
मात्र काही कारणाने त्या रद्द झाल्या, हे सर्व काही नशिबाचे खेळ आहे आणि माझ्या नशिबात सहजासहजी कोणती गोष्ट मला मिळालेली आजवर आठवत नाही. अनेकदा तोंडाजवळ येऊन घास हिरावला जातो. हा मात्र मी खचणार नाही शिव ठाकरे कधीही खचणार नाही. कदाचित माझी अजून वेळ आली नाही. पण लवकरच मी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर दिसेल”.

पुढे बोलताना शिव म्हणाला, “बिग बॉस मराठी संपल्यानंतर मला अनेक ऑफर आल्या होत्या.
पण त्यानंतर कोरोना आला त्यामुळे त्यातील काही प्रोजेक्ट रद्द झाले.
तर काही गोष्टी हातातून गेल्या,काहींनी नकार दिला. पण असं वाटतं जे झालं ते बर झालं.
ते झालं नसतं तर मी आज हिंदीत आलो नसतो आणि माझी इच्छा अपूर्ण राहिली असती.”

Web Title :- Shiv Thakare | shiv thakare comment on not doing marathi film said i- selected but

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | धक्कादायक ! आर्थिक विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

MPSC | नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, आयोगाकडून विद्यार्थ्यांची मागणी मान्य

Pune Kasba Peth Bypoll Election | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांचा आणि त्यांच्या कुटूंबियांचा भाजप उमेदवार हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा