दिलीप कुमार यांची नात ‘सय्येशा’नं शेअर केला पतीसोबतचा रोमँटीक फोटो ! लोकांनी केलं ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची नात सय्येशा सैगल (Sayyeshaa Saigal) आपल्या एका फोटोमुळं सध्या चर्चेत आली आहे. सय्येशानं तिच्या पतीसोबतचा रोमँटीक फोटो शेअर केल्यानं ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

सय्येशानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती पती आर्या सोबत रोमँटीक अंदाजात दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. सध्या तिचा हा फोटो सोशलवर व्हायरल होत आहे.

अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि सय्येशाला ट्रोल केलं आहे. पतीच्या वयावरून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकानं कमेंट करत लिहिलं की, वडिल आणि मुलगी. काहींनी तर अश्लील कमेंटही केल्या आहेत. सय्येशानं लग्न केलंच असं असा सवालही काहींनी केला आहे.

सय्येशानं गेल्या वर्षी 10 मार्च 2019 रोजी साऊथमधील अभिनेता आर्या (Arya) सोबत लग्न केलं. त्यावेळीही लोकांनी तिला ट्रोल केलं होतं. कारण तिचा पती तिच्यापेक्षा 17 वर्षांनी मोठा आहे. यावेळी सय्येषा फोटोमुळं ट्रोल होण्याचं कारण तिच्या पतीच्या आणि तिच्या वयातील अंतर आहे. सय्येशाबद्दल बोलायचं झालं तर ती दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानोची भाची शाहीनची मुलगी आहे.

सय्येशाआणि आर्या यांनी गजनीकांत या साऊथमधील सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. आर्या साऊथमधील फेमस ॲक्टर आहे. तो ॲक्टर आणि एक उद्योगपती देखील आहे. चेन्नईमधील शी सेल या हॉटेलचा तो मालक आहे. द शी पीपल नावाची त्याची एक प्रॉडक्शन कंपनीही आहे. यात तो नवीन टॅलेंटला पुढं जाण्याची संधी देतो.

आर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायंच झालं तर त्यानं कलभा कलधन, माय कन्नाडी, सर्वम, राजा रानी, जीवा अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

सय्येशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अजय देवगण स्टारर शिवाय सिनेमातून डेब्यू केला होता.