Shivaji Nagar Court On Pune Police | ललित पाटील पलायन प्रकरणावरून न्यायालयाने पुणे पोलिसांना सुनावलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivaji Nagar Court On Pune Police | ड्रग्स माफिया ललित पाटील (Drug Peddler Lalit Anil Patil) पळून गेल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा भाऊ भूषण पाटील (Bhushan Anil Patil) आणि त्याच्या साथीदाराला नेपाळ सिमेवरुन अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने पुणे पोलिसांना खडेबोल सुनावले. एखादं कटींगचं दुकान उघडलं तरी पोलिसांना समजतं, जे आहेत ते सांभाळता आलं नाही आता तुम्हाला 14 दिवसांची पोलीस कोठडी कशाला हवी? असं म्हणत ललित पाटील पलायन प्रकरणावरुन पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए सी बिराजदार यांनी टिप्पणी केली (Pune Drug Case). दरम्यान, सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे (Abhishek Vilas Balkawade) यांना 16 ऑक्टोबर पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली. (Shivaji Nagar Court On Pune Police)

नेपाळ सिमेजवळील बाराबंकी-गोरखपूर रोड येथून ताब्यात घेतलेल्या ड्रग्स तस्कर भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना बुधवारी (दि.11) न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना 16 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकणाचा मुख्य आरोपी ललित पाटील मात्र पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी झाला आहे. (Shivaji Nagar Court On Pune Police)

अटक करण्यात आलेले आरोपी भूषण आणि अभिषेक हे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते.
मात्र, त्याआधीच पुणे पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर रात्री उशिरा पुण्यात आणण्याची प्रक्रिया पार पडली.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे केलेल्या तपासात भूषण आणि अभिषेक हे उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी उत्तर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. या घटनेवर पोलीस आयुक्त रितेश कुमार,
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे हे स्वत: लक्ष
ठेवून होते. भूषण आणि अभिषेकला ताब्यात घेतल्याचे समजल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि
त्यांचे पथक उत्तर प्रदेशात गेले. त्यांनी रात्री उशिरा दोघांना पुण्यात आणले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या लेखापाल यांना लाच प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

Parth Ajit Pawar – PDCC Bank Pune | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी पार्थ पवार?