Shivaji Nagar Pune Crime | पुणे : पैसे घेऊन बनावट जामीनदार होणाऱ्या दोघांवर FIR

पुणे : Shivaji Nagar Pune Crime | पुणे पोलिसांनी बनावट जामीनदार (Fake Guarantor) होणाऱ्या टोळीवर कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा असा प्रकार शिवाजीनगर न्यायालयात (Shivaji Nagar Court Pune) घडला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या जामिनासाठी बनावट जामीनदार उभा करण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकासह दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत योगेश प्रकाश अंबुरे (वय-38 रा. जांभुळवाडी रोड, कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन योगेश उमेश सुर्यवंशी Yogesh Umesh Suryavanshi (वय-29 रा. पिंपळे सौदागर) याच्यासह बनावट आधारकार्ड व 7/12 उतारा तयार करुन देणाऱ्या व्यक्तीवर आयपीसी 420, 419, 467, 468, 471, 200, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर न्यायालयातील (Shivaji Nagar JMFC Court) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. 1 बिराजदार कोर्टात घडला आहे.

बनावट जामिनदारांच्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर ‘सीआयएस’ प्रणालीचा वापर सुरु करण्यात आला आहे. या प्रणालीमध्ये योगेश सुर्यवंशी हा बनावट जामीनदार सापडला आहे. पोलीस बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्यातील आरोपी शिव पवन झंवर याच्या जामिनाची सुनावणी कोर्टात सुरू होती.

आरोपीचे वकील विजय लेंगरे यांनी जामीनदाराला कोर्टात हजर केले.
त्याची समक्ष आणि सीआयएस संगणक प्रणालीद्वारे पडताळणी केली.
त्याने स्वत:चे नाव शंकर भिकु राठोड असे सांगितले.
मात्र, प्रत्यक्षात त्याचे नाव योगेश सुर्यवंशी असल्याचे निदर्शनास आले.
पैसे घेऊन बनावट जामिदाराची कामे आरोपी करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त