Shivaji Nagar Pune Crime | तीन सराईत वाहन चोरांना शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, तीन गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivaji Nagar Pune Crime | पुणे शहरात वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना (Criminals On Police Records) शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तीन दुचाकी जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई 10 एप्रिल रोजी संचेती हॉस्पिटल (Sancheti Hospital) समोरील रोडवर करण्यात आली.

विशाल सुरेश साळुंखे Vishal Suresh Salunkhe (वय-22), सौरभ सुरेश साळुंखे Saurabh Suresh Salunkhe (वय-20), मनोज मारुती तोळे Manoj Maruti Tole (वय-20 दोघे रा. कऱ्हाड, सातारा) अशी अटक केलेल्या सराईत वाहन चोरांची नावे आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण दडस यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी संचेती हॉस्पिटल समोरील रोडवर येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचुन विशाल साळुंखे याला गुन्ह्यातील दुचाकीसह ताब्यात घेतले.

आरोपीकडे सखोल चौकशीत हा गुन्हा विशाल साळुंखे याचा भाऊ सौरभ साळुंखे व त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तपास पथकाने कऱ्हाड येथे जाऊन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यतील दुचाकी व आरोपी सौरभ साळुंखे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचा साथीदार मनोज तोळे याला ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी वाकड पोलीस स्टेशनच्या (Wakad Police Station) हद्दीतून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तीन गुन्हेगारांकडून तीन दुचाकी जप्त करुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन व वाकड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास मुंडे,
सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश भिवरे, पोलीस अंमलदार रणजित फडतरे, अतुल साठे,
राजकिरण पवार, प्रवीण दडस, सुदाम तायडे महिला पोलीस अंमलदार द्वारका मोहिते यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त