आठवड्यात फक्त 15 तास काम करून वर्षभरात 89 लाख रूपये कमवले ‘या’ 23 वर्षाच्या युवकानं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिजिटल युगामध्ये दिवसेंदिवस हॅकिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी सारखे प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे एथिकल हॅकर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. 23 वर्षीय भारतीय हॅकर शिवम वशिष्ठ ऑनलाइन बग शोधून वर्षाला 89 लाख रुपये कमावत आहे.

या कंपनींसाठी करतो काम
शिवम वरिष्ठ एथिकल हॅकर आहे आणि सॅन फ्रॅंसिस्को मधील हॅकरवन या कंपनीसोबत तो ऑनलाइन पद्धतीने बग शोधण्याचे काम करतो. या कंपनीकडे स्टारबक्स, इंस्टाग्राम, गोल्डमॅन सॅक्स, ट्विटर, झोमॅटो आणि वनप्लस असे क्लायंट्स आहेत.

काय आहे एथिकल हॅकिंग
इंटरनेटशी जोडले जाऊन कम्प्युटरच्या सुचनांना अवैधरित्या प्राप्त करणाऱ्याला हॅकर म्हणतात आणि हे काम करणाऱ्याला पेशाने एथिकल हॅकर म्हटले जाते.

आठवड्याला 15 तास करतो हॅकिंग. मिळालेल्या माहितीनुसार शिवम आता आपल्या भावाला देखील हॅकिंग शिकवत आहे. एकाच गोष्टींवर अनेक दिवस देखील कधी कधी काम करायला लागत असल्याचे शिवम सांगतो. त्याने आपल्या परिवाराला निवृत्तीमध्ये मदत केली आहे.

हॅकर द्वारे सुरक्षा कार्यक्रमांमध्ये प्रत्येक वर्षाला 30 % नी वाढ झाली आहे. अमेरिकेत हॅकर्सने एकूण बाउंटी प्रोग्रॅम्स पैकी 19 % जिंकले आहेत. 10 % नी याबाबत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

19 वर्षाचा असताना सुरु केले हॅकिंग
19 वर्षांचा असताना आपण एथिकल हॅकिंग सुरु केल्याचे शिवमने सांगितले. सुरुवातीला त्याच्या कुटुंबियांना काळजी वाटत होती परंतु नंतर हा प्रकार अधिकृत आणि कायदेमान्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 20 वर्षाचा असताना त्यांनी पहिली बाउंटी जिंकली आणि त्यानंतर मास्टरकार्ड वरून देखील त्याने बाउंटी जिकंण्याचा सन्मान प्राप्त केला.

कंपन्या देतात बग शोधण्याचे लाखो रुपये
झोमॅटो सारख्या कंपनीने बग शोधण्यासाठी आतापर्यंत 435 हॅकर्सला 70 लाख रुपयांपेक्षा अधिक जास्त पैसे दिलेले आहेत. वनप्लस ने नुकतीच एक घोषणा केली आहे. त्यांनी एक सिक्योरिटी रिस्पॉन्स सेंटर सेट-अप केला आहे जो सिक्योरिटी एक्सपर्ट्सला आता बाउंटी ऑफर करेल. एक्सपर्टला 50 डॉलर ते 7,000 डॉलर पर्यंत इनाम मिळेल. अ‍ॅपलने देखील बग बाउंटी प्रोग्राम खोलला आहे. ज्यामध्ये देखील बग शोधल्यावर मोठी बाऊंटी हॅकरला मिळते.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/