Shivendra Raje Bhosale | कास महोत्सवाच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात आली असून वन विभागाने कारवाई करणं गरजेच – आ. शिवेंद्रराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – Shivendra Raje Bhosale | साताऱ्यात (Satara) जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास जंगल पठार (Kaas Pathar) परिसरात 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान कास महोत्सवाचे (Kas Festival) आयोजन करण्यात आले आहे. कास पठार हा इको सेन्सेटिव्ह झोन (Eco Sensitive Zone) असून महोत्सवाच्या नावाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली असून वन विभागाने कारवाई केली पाहिजे असे सांगत या महोत्सवाच्या नावाखाली वृक्षतोड केली. (Shivendra Raje Bhosale)

ही दुर्दैवी बाब असून कुठल्यातरी लोकप्रतिनिधींच्या बगलबच्च्याची घरे चालवण्यासाठी शासनाचा पैसा खर्च करणे हे चुकीचे असून याची तक्रार शासनाकडे करणार असल्याचे सांगत आमदार शिवेंद्रराजेंनी (Shivendra Raje Bhosale) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर निशाण साधला आहे. याचा खर्च शासन करत आहे का खासगी डान्स क्लास चालवणाऱ्याच्या आग्रहाखातर आणि लोकप्रतिनिधीच्या आग्रहाखातर होत आहे? अशी शंका उपस्थित होत आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा धंदा सुरू असून हे प्रकार चुकीचा आहे.
महोत्सव प्रशासनाने स्वतः करावा खासगी लोकांना काँट्रॅक्ट देऊन करू नये. यासाठी पर्यटन विभागाने (Department of Tourism) आदेश काढले आहेत का? शासनाने परिपत्रक काढले आहे का? याची माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली नाही याचे उत्तर प्रशासनाने दिल पाहिजे.
असा सवाल उपस्थित करत इको सेन्सटिव्ह झोनमध्ये होणाऱ्या कास महोत्सवला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोध दर्शविला आहे.

कास पुष्प पठारला वर्ल्ड हेरिटीजचा (World Heritages) दर्जा आहे.
येथे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात येत असलेली वेगवेगळ्या रंगाची फुले पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात.
या कास पठाराची आणि परिसराची माहिती पर्यटकांना मिळावी आणि पर्यटनाला चालना मिळावी.
या उद्देशाने कास महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title :- Shivendra Raje Bhosale | Trees have been felled in the name of Kas festival and it is necessary for the forest department to take action. Shivendraraj Bhosale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC Jeevan Umang Policy | LIC च्या या योजनेत दरमहिना 1302 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 27 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम, जाणून घ्या

Beed Crime | प्रेमाचे नाटक करुन महिला पोलीस अंमलदारावर अत्याचार, ब्लॅकमेल करत उकळले तब्बल 13 लाख