Shivsena Chief Uddhav Thackeray | शिंदे-नार्वेकरांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य, न्यायमूर्ती आरोपीला दोनदा भेटले, मग कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन Shivsena Chief Uddhav Thackeray | आमदार अपात्रता प्रकरणात लवाद असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) भेट घेतली आहे. विधानसभेचे अध्यक्ष असे मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात का? याचा अर्थ न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटले आहेत. आरोपीला दोनदा अध्यक्ष का भेटले? असा प्रश्न उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, लवाद ज्यावेळी नेमून दिला जातो तेव्हा विधानसभा अध्यक्ष हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कसे काय जातात? यांची मिलिभगत आहे का असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. एकनाथ शिंदे आमच्या दृष्टीने आरोपीच आहेत. न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची? असा आमचा जनतेच्या न्यायालयात प्रश्न आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqulification Case) एप्रिल, मे महिन्यात निकाल देताना योग्य वेळेत निकाल लावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरची मुदत दिली. त्यानंतर १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिली. माझी अशी अपेक्षा आहे की १० जानेवारीच्या रात्री ११.५९.५९ सेकंदांपर्यंत राहुल नार्वेकर वेळ खेचतील आणि आणखी वेळकाढूपणा करतील.

ते पुढे म्हणाले, उल्हास बापट यांच्याशी चर्चा केली. त्यांनी म्हटले की दोन महिन्यात ज्या खटल्याचा निकाल लागायला
हवा होता त्यात दोन वर्षे काढली. ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले जातेय, ते पाहता लोकशाहीचा खून होतोय का? अशी
आता शंका निर्माण झाली आहे.

उद्धव ठाकरे म्हणोल, आरोपीला न्यायमूर्ती उघडपणे भेटत असतील तर त्यांच्याकडून निकालाची काय अपेक्षा ठेवणार?
जनतेला कल्पना आलीच असेल. आम्ही जनतेच्या न्यायालयात काम करणारे लोक आहोत.
हे सगळे लोकांच्या डोळ्यांदेखत घडत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आता अपेक्षा आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेच्या न्यायालयात हा विषय मांडायचा म्हणून हे तुम्हाला सांगतो आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश होते त्यात वेळकाढूपणा केला. सध्याचे सरकार बेकायदेशीर दोन वर्षे राज्य करत आहे.
हे लोकशाहीसाठी घातक आहे. उद्याही वेळकाढूपणा केला जाईल पुढची तारीख मिळेपर्यंत निवडणुका होऊन जातील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अफ्रिकन नागरिकाकडून मेफेड्रोन व मेथाक्युलोन अंमली पदार्थ जप्त, पुणे गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : मंडळ अधिकाऱ्यांकडे केलेला हरकत अर्ज मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी, दोघांवर FIR

चालकाला कोयत्याने मारहाण करुन लुटले, दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; भोसरी येथील घटना

Radha Krishna Vikhe Patil | तलाठी भरती : मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोधकांना थेट इशारा, सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू!

Comedian Navin Prabhakar | कॉमेडियन नवीन प्रभाकर याचा 14 जानेवारीला खास शो रंगणार

Congress Mohan Joshi On Pune Metro | मेट्रो मार्ग तातडीने पूर्ण करा ! संयमाचा अंत पाहू नका, विमानतळापर्यंत मेट्रो सेवा करा – माजी आमदार मोहन जोशी