Shivsena | शिवसेनेची सामनातून भाजपवर टीका; ‘राज्यात भाजपचा ‘अंतकाळ’ जवळ आलाय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena | राज्यात महापालिका निवडणुकीचे (Municipal election) बिगुल लवकरच वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena)-भाजपमध्ये (BJP) संघर्षाची भाषा सुरू झाली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय युद्ध चांगलेच रंगले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी लाड यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजपचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. भाजपची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत. त्यावरून महाराष्ट्रात भाजपचा अंत काळ जवळ आला आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे.

शिवसेना भवन (shivsena Bhavan) हे मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. याकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहिल ते यच्चयावत नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटारात वाहून गेले. ते पुन्हा कधीच कुणाला सापडू शकले नाहीत. भाजपमधील काही बाटग्या टिनपाट मंडळींनी ‘शिवसेना भवन फोडू’ अशी भाषा करावी व व्यासपीठावरील मराठी पुढाऱ्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय ? शिवसेनेशी राजकीय मतभेद (political differences) असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली असं त्यांनी म्हटलं आहे.

बाटग्यांच्या बळावर लढाया लढल्या नाहीत

शिवसेनेचा सत्ता हा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत. भाजपला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधी अनेक वर्षांपासून गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करीत आहे. घरभेद्यांच्या निषेधाच्या आरोळय़ांनी जी शिवसेना गडबडली नाही, दिलेल्या शब्दास न जागणाऱ्या भाजपच्या फसवेगिरीने नाउमेद झाली नाही. उलट आज ती शिवसेना महाराष्ट्राची सत्ताधारी (Shivsena ruler of Maharashtra) झाली असा टोलाही शिवसेनेने भाजपाला लगावला आहे. निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा कधी काळी भाजप पक्ष होता. या पक्षात हिंदुत्ववादी विचारांची पिढी होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे.

भाजपच्या बाटग्यांनी इतिहास समजून घ्यावा

जनता पक्षाच्या काळातही काही मंडळींनी असाच उतमात केला. शिवतीर्थावरील (Shivtirth) एका सभेच्या निमित्ताने शिवसेना भवनावर दगड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची पार्सले कोणत्या स्थितीत घरी किंवा इस्पितळात पोहोचली याचा इतिहास भाजपमधील बाटग्यांनी समजून घ्यावा.
जनता पक्षाने शिवसेनेशी पंगा घेतला आणि भविष्यात औषधालाही पक्ष शिल्लक राहिला नाही,
असा इशाराही सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला देण्यात आला आहे.

आडवाणी–अटलबिहारींच्या महान पक्षाची घसरगुंडी

दरम्यान, हेच शिवसेना भवन 1992 च्या ‘बाबरी’ दंगलीत हिंदुत्वाच्या स्वाभिमानाने खंबीरपणे मराठी व हिंदूंचे रक्षणकर्ते म्हणून उभे होते. दंगलखोर पाकड्यांना घाबरून आजचे हे बाटगे घरातच गोधड्या भिजवत होते. आम्ही बाबरी पाडली नाही हो ।।, असा आक्रोश करून बाबरास पाठ दाखवून पळणारे आज या बाटग्यांच्या जीवावर शिवसेनेशी ‘सामना’ करू पाहतात ही आडवाणी–अटलबिहारींच्या महान पक्षाची घसरगुंडी आणि शोकांतिका नाहीतर काय? असेही शिवसेनेने भाजपला सुनावलं आहे.

Web Title :  shivsena | end bjp near maharashtra Shivsena target bjp over prasad lad statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Latur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार

Lisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर, अभिनेत्रीच्या एका शब्दाने केली बोलती बंद

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,479 नवीन रुग्ण,
तर 4,110 जणांना डिस्चार्ज

PIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख रुपये कॅश?
जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण