एका बॅनरवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वाढदिवसानिमित्‍त ‘शुभेच्छा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात या दोन मोठ्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा बॅनर मुंबईत पाहयाला मिळाला, विशेष म्हणजे हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षातील आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी शुभेच्छा देणारा बँनर पाहायला मिळाला. यात हे दोन्ही नेेते एकाच बॅनरवर सोबत झळकले आहेत. विशेष म्हणजे हा बॅनर साताऱ्याचे खासदार आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणारे नरेंद्र पाटील यांनी लावला आहे. हा बॅनर सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे.

राष्ट्रवादी भाजपचे नेते एकाच बॅनरवर –

बॅनरवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादीचे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील फोटो लावण्यात आले आहेत.

माथाडी कामगार संघटनेने लावला बॅनर –

कायमच एकमेकांविरोधात बोलणारे राष्ट्रवादीचे आणि भाजपचे नेते या निमित्ताने एकाच बॅनरवर दिसले आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले नरेंद्र पाटील यांच्या माथाडी कामगार संघटनेने हा वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देणारा बॅनर लावला आला.

नरेंद्र पाटील आणि माथाडी कामगार संघटना –

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार नेते म्हणून ओळखले जातात.
माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील.
नरेंद्र पाटील यांना विधानसभा सदस्यांनी आमदार म्हणून निवडून आलेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणूक शिवसेनेत प्रवेश केला.