Shivsena MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी दोन आठवड्यानंतर, एकमेकांना कागदपत्रे देण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश

ADV

जालना : शिवसेना शिंदे गट (Shinde Group) आमदार अपात्र प्रकरणी (Shivsena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी सुरू केली आहे. मात्र, दोन्ही कडील सदस्यांना एकमेकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी अध्यक्षांनी (Assembly Speaker) वेळ दिला आहे. आता ही सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. एका आठवड्यात दोन्ही गटांनी आपले म्हणणे सादर करावे, असे आदेश अध्यक्षांनी दिले आहेत. (Shivsena MLA Disqualification Case)

अध्यक्षांनी आज दोन्ही गटांचा युक्तीवाद ऐकून घेतला. यावेळी ठाकरे गटाकडून (Thackeray Group) सुरुवातीला देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. पहिला युक्तिवाद हा सुनिल प्रभू यांनी दाखल केलेला व्हिप नेमका कोणाचा यावर झाला.

ADV

यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाकडून अनिल सिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.
अनिल सिंह साखरे यांनी आम्हाला कागदपत्रे मिळाली नाहीत असे निदर्शनास आणून दिले.
त्यावर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाला आपआपली कागदपत्रे एका आठवड्यात एकमेकांना सादर करण्याचे आदेश दिले. (Shivsena MLA Disqualification Case)

याबाबत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी सांगितले की, अनिल सिंह साखरे यांनी बाजू मांडली.
दोन्ही गट एका आठवड्यात म्हणणे मांडणार आहेत. लवकरात लवकर निर्णय व्हायला पाहिजे.
दोन्ही गटाला एक आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. पुढील सुनावणी दोन आठवड्यात होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका; म्हणाले, “ बघू मराठा आरक्षण देतात की निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा लोकांच्या तोंडाला पाने पुसतात”