Shivsena MLA Disqualification Case | आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर नेत्यांची प्रतिक्रिया; कोण काय म्हणाले?

पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MLA Disqualification Case | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले. निम्म्याहून अधिक शिवसेना आमदार व खासदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाकारत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडून मागील एक वर्षाहून अधिक काळ सत्तासंघर्ष सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) हे आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार, नेत्यांसह अपक्ष आमदारांना देखील अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualification Case) कारवाईवर राहुल नार्वेकर यांनी आजपासून (दि.14) सुनावणी सुरु केली असून शिंदे गट (Shinde Group) व ठाकरे गट (Thackeray Group) यांचे वकिल आणि संबंधित आमदारांनी उपस्थिती लावली आहे. विधानसभेमध्ये सुरु करण्यात आलेल्या सुनावणीवर अनेक राजकीय लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी स्वायत्त संस्थांवर सत्ताधाऱ्यांचा प्रभाव असल्याचा घणाघात केला. भास्कर जाधव म्हणाले की, “ठराविक वेळेत व्हायला हवी होती ती सुनावणी आता होत आहे. सुप्रिम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याचा सन्मान राखून निर्णय घ्यावा, सुप्रिम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर कोणती संस्था वेगळा निर्णय घेत नाही. भरत गोगावले (Bharat Gogave) यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती चुकीची आहे, सुनील प्रभू प्रतोद आहेत. यामुळे आम्हाला दिलेली नोटीस ही चुकीची आहे असे माझे मत आहे. स्वायत्त संस्था कोणता निर्णय घेणार हे सत्ताधारी सांगतात यावरून स्वायत्त संस्था कोणत्या परिस्थितीत आहेत हे लक्षात घ्या,.” अशा कडक शब्दांमध्ये भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. (Shivsena MLA Disqualification Case)

ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय व योग्य निर्णय द्यावा अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाला देखील निर्णय हा त्यांच्याच बाजू लागणार असल्याचा विश्वास आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांनी अपात्रतेवर सुरु झालेल्या कारवाईबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला विश्वास आहे अध्यक्षांचा निकाल शिंदेच्या आमदारांच्या बाजूने येईल, विरोधक विरोधकांचे काम करत आहेत शिवसेना पक्ष आमच्याकडे आहे. चिन्ह आमच्याकडे आहे. अध्यक्षांमार्फत येणारा निर्णय आधी येऊ द्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये जातील किंवा हायकोर्टमध्ये जातील हा विरोधकांचा विषय आहे, असे मत योगेश कदम यांनी व्यक्त केले आहे.

तसेच आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांनी देखील अपात्रतेच्या सुनावणीवर मत व्यक्त केले आहे.
ते म्हणाले की, आमचे वकील आमची बाजू मांडण्यासाठी देखील तयार आहेत. जे घटनेमध्ये लिहिले आहे ते घटनेच्या
बाहेर कोणी जाऊ शकत नाही. आम्हाला नाही वाटत आमच्यावर कारवाई होईल अशी खात्री प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केली आहे.

तसेच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांच्यावर देखील अपात्रतेची टांगती तलवार
असल्याने त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, “आज अध्यक्षांसमोर शिवसेनेचे आमदार पात्र की अपात्र,
शिवसेना पक्ष चिन्ह कोणाचं ह्यावर सुनावणी होणार आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्यावर कोणतीही कायदेशीर
कारवाई होणार नाही. अध्यक्ष देतील तो निकाल आमच्या बाजूनेच लागण्याची शक्यता दाट आहे.
कोण जिंकेल कोण हारेल या निकालावर सर्व जनतेचे लक्ष आहे. असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी दोन आठवड्यानंतर, एकमेकांना कागदपत्रे देण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश