Shivsena MLA Disqualification Case | शिवसेना आमदार अपात्र प्रकरण! एका आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे दोन्ही गटांना विधानसभा अध्यक्षांकडून आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर (Shivsena MLA Disqualification Case) आज सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray Group) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली होती. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची (Shivsena MLA Disqualification Case) कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) सोपवलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी याप्रकरणाची आज सुनावणी सुरु केली. दरम्यान, एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करा, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना दिले आहेत.

या प्रकरणावर (Shivsena MLA Disqualification Case) दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी होणार आहे. दोन्ही गट एकमेकांना कागदपत्र देणार आहेत. आज ठाकरे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. सुरुवातीला देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. विधानसभा अध्यक्षांनी सुरुवातीला देवदत्त कामत यांच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घेतली. ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आले. मात्र, शिंदे गटाकडून (Shinde Group) कागदपत्र दाखल करण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन्ही गटांना उर्वरित कागदपत्रे दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला.

याबाबत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) म्हणाले, अनिल सिंग यांनी बाजू मांडली.
दोन्ही गट एका आठवड्यात म्हणणं मांडणार आहेत. लवकरात लवकर निर्णय व्हायला पाहिजे.
दोन्ही गटाला एक आठवड्याचा वेळ दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Toll Hike | मुंबईचा रस्तेप्रवास महागला; पथकराच्या दरामध्ये झाली वाढ,1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू