Mumbai Toll Hike | मुंबईचा रस्तेप्रवास महागला; पथकराच्या दरामध्ये झाली वाढ,1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई शहरामध्ये प्रवेश करण्याआधी प्रवाशांना पथकर (Mumbai Toll Hike) द्यावा लागतो. दररोज लाखो गाड्या या शहरामध्ये प्रवेश करत असतात. या प्रत्येकाकडून करवसुली केली जाते. मात्र आता यामध्ये वाढ झाली असून मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या गाड्यांसाठी पथकर वाढवण्यात आला आहे. पथकर गेल्या 21 वर्षांत दुपट्टीने वाढवण्यात आला आहे. या आधी शहरात प्रवेश करताना गाडीला 40 रुपये पथकर (Mumbai Toll Hike) द्यावा लागत होता. आता यामध्ये 5 रुपयांनी वाढ करण्यात आली असून नवीन दर प्रत्येक गाडीसाठी 45 रुपये करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मुंबई महापालिका (BrihanMumbai Municipal Corporation (BMC) क्षेत्राच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी 2002 सालापासून पथकर गोळा करण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी Maharashtra State Road Development Corporation (एमएसआरडीसी – MSRDC) एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर (MEP Infrastructure) ही कंपनी पथकर वसूल करते. हे टोल घेणारे नाके सायन-पनवेल मार्गावर (Sion-Panvel route) वाशी येथे, ऐरोली-मुलुंड मार्गावर (Airoli-Mulund Route) ऐरोली येथे, तर पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथे उभारण्यात आले आहे. तर ठाणे शहरातून मुलुंड येथे जाताना दोन पथकर नाके आहेत. चारचाकी, मिनी बस, ट्रक व अवजड वाहने अशा वेगवेगळ्या गाड्यांसाठी वेगवेगळे दर असतात आणि दर तीन वर्षांनी हे दर वाढवले जातात. आता देखील हे दर वाढवण्यात आले असून ही सातवी दरवाढ आहे.

मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या चारचाकीसाठी याआधी 40 रुपये टोल होता.
आता त्यामध्ये वाढ करुन 45 रुपये करण्यात आला आहे.
या आधी मिनी बससाठी 65 रुपये घेतले जात होते आता यामध्ये 10 रुपयांनी वाढ करण्यात आली असून दरवाढीप्रमाणे
आता 75 रुपये मिनी बससाठी घेतले जाणार आहे. तसेच ट्रकसाठी याआधी 130 रुपये घेतले जात होते तर अवजड
वाहनांसाठी 160 रुपये पूर्वी घेतले जात होते. नवीन लागू करण्यात आलेल्या दरानुसार ट्रकसाठी 150 रुपये तर अवजड
वाहनांसाठी 190 रुपये घेतले जाणार आहे. मुंबईतील पथकरमध्ये लागू करण्यात आलेले नवे दर येत्या 1 ऑक्टोबर
पासून लागू करण्यात येणार असून पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे 2026 पर्यंत हे नवे दर घेतले जाणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections | 48 मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Pune News | आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन जनशक्तीची मागणी

Modi Govt On Ujjwala Yojana | एलपीजी गॅस संदर्भात खुशखबर! केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतून 75 लाख मोफत गॅस कनेक्शन