Shivsena MP Revolt | शिवसेनेच्या 12 खासदारांचा CM एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

0
215
Shivsena MP Revolt | shivsena revolt mp rahul shewale bhavna gavli and other 10 mp supported the cm eknath shinde group
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Shivsena MP Revolt | महाराष्ट्रात शिवसेनेत (Maharashtra Shivsena) उभी फूट पडल्यानंतर आता दिल्लीतही पक्षाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी (Shivsena MP Revolt) वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या लोकसभेतील 12 खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते म्हणून निवड केली. तसेच खासदार भावना गवळी (MP Bhavna Gawli) मुख्य प्रतोद असल्याचंही ते म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांना 12 खासदारांनी याबाबत पत्र दिले असल्याचीही माहिती शिंदे यांनी दिली.

 

दिल्लीत येण्याची दोन कारणं
आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली. तिच भूमिका दिल्लीत हे खासदार घेत आहेत. याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. जनतेच्या मनातलं सरकार आम्ही राज्यात स्थापन केलं आहे आणि याचं स्वागत या 12 खासदारांनीही केलं आहे. उद्या ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) केस कोर्टात आहे. त्या कामासाठी मी इथं आलो होतो. त्यासोबतच या खासदारांचं स्वागतही करण्यासाठी इथं आलो आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Shivsena MP Revolt)

 

संजय राऊत रोज सकाळी मॅटिनी शो घेतात
ईडी (ED) आणि केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे खासदार फुटले आहेत अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून केली जात आहे.
याबाबत बोलताना शिंदे यांनी राऊतांना टोला लगावला. दुसरं कोण बोललं असतं तर मी बोललो असतो.
पण संजय राऊत काही दखल घेण्यासारखे नाहीत. तसेच संजय राऊत रोज सकाळी मॅटिनी शो घेतात.
त्यांचं बोलण्याला काय महत्व द्यायचे? असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

हे खासदार उपस्थित
श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), राहुल शेवाळे, हेमंत पाटील (Hemant Patil), संजय मंडलिक (Sanjay Mandalik),
राजेंद्र गावीत (Rajendra Gavit), प्रताप जाधव (Pratap Jadhav), भावना गवळी, हेमंत गोडसे (Hemant Godse),
कृपाल तुमाने (Kripal Tumane), श्रीरंग बारणे (Shrirang Barane), धैर्यशील माने (Darsheel Mane), सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande)

 

Web Title :- Shivsena MP Revolt | shivsena revolt mp rahul shewale bhavna gavli and other 10 mp supported the cm eknath shinde group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Rahul Shewale | राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसारच आम्ही…’

 

Uddhav Thackeray | बंडखोरांनी नाही तर भाजपने शिवसेनेत फूट पाडली, उद्धव ठाकरेंचा घणाघात

 

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर बलात्कार, फेसबुकवर झाली होती ओळख