Shivsena MP Sanjay Raut | महाराष्ट्राबाहेरील गुंडांचा वापर करून दंगलीचा डाव ?; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला (Maharashtra State Government) अल्टिमेटम दिला. यावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील गुंडांची मदत घेण्यात येत असल्याचे,’ राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, दुसरीकडे राज्यातील गृह विभागाकडेही (Maharashtra Home Department) अशाच प्रकारची माहिती असल्याने पोलीस सतर्क असल्याचे सांगितले जात आहे.

 

”राज्याच्या बाहेरुन काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांची राज्यात ताकद नाही.
अशा लोकांकडून हे काम सुरू असल्याचा,” आरोप संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केला आहे.
”महाराष्ट्रात अशा प्रकारच्या सुपाऱ्या चालणार नाही. मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
तर, राज्यातील यंत्रणा, नेतृत्व सक्षम आहे. हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील. तर ती त्यांची सर्वात मोठी चूक ठरणार असल्याचा इशारा देत, राज्यातील पोलीस योग्य पावले उचलत असल्याचेही,” संजय राऊत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उद्या परराज्यातील लोक येणार असून कायदा सुव्यवस्था बिघडू शकतात अशी शक्यता आहे.
अशा प्रकारचा अहवालही गृह विभागाला मिळाला असून योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना दिली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणी केल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत.
या कारवाईसाठी कोणाच्या आदेशाची प्रतिक्षा करू नये, अशा सूचनाही गृहविभागाने पोलिसांना दिल्या आहेत.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | loudspeaker controversy shiv sena leader sanjay raut claim that some elements trying to riots using outsiders of maharashtra state

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा