Shivsena | उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Former MP Shivajirao Adhalarao Patil) यांनी अखेर शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बोलावलेल्या बैठकीला त्यांनी हजेरी लावत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला (Shivsena) ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. मागील काही दिवसांपासून आढळराव पाटील यांच्या राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे.

 

शिंदे गटाने शिवसेनेची (Shivsena) नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात नेतेपदी रामदास कदम (Ramdas Kadam) आणि आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांची निवड केली आहे. या दोघांचीही काही तासांपूर्वीच शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदे गटाने उपनेतेपदी (Deputy Leaders) यशवंत जाधव (Yashwant Jadhav), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), उदय सामंत (Uday Samant), शरद पोंक्षे (Sharad Ponkshe), तानाजी सावंत (Tanaji Sawant), विजय नहाटा (Vijay Nahata), शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली आहे.

 

शिरुर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Lok Sabha Constituency) शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळारव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती अनावधानाने प्रसिद्ध झाली अशी कबुली शिवसेनेकडून देण्यात आली होती. त्यानंतर यांनी मी शिवसेनेतच आहे, असं जाहीर केलं होतं. मातोश्रीवर ठाकरे यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला होता.

आढळराव पाटलांची फेसबुक पोस्ट
शिरुर लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उद्या मंगळवार 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शिवनेरी निवास,
लांडेवाडी, तालुका- आंबेगाव येथे माझ्या व शिवसेना जिल्हाप्रमुख जुन्नर विधानसभेचे मा. आमदार शरददादा सोनवणे (MLA Sharad Sonwane)
यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
कृपया शिवसेना व सर्व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी,
लोकप्रतिनिधी व तमाम शिवशैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आढळराव पाटील यांनी केले आहे.

 

 

Web Title :- Shivsena | shirur ex mp shivajirao adhalrao patil join rebel eknath shinde group left shivsena uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | राजस्थानमधून पुण्यात अफू विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक, 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजाराची लाच मागणाऱ्या कोतवालावर पुणे एसीबीकडून FIR

 

Shivsena | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर