Pune Crime | राजस्थानमधून पुण्यात अफू विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक, 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राजस्थानमधून पुण्यात अफूची (Opium) विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने (Pune Police Crime Branch) अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.16) टिळक रोडवरील (Tilak Road) हिराबाग चौक (Hirabaug Chowk) येथे केली. आरोपीकडून तीन किलो अफू, मोबाईल संच, रोकड असा एकूण 8 लाख 50 हजार रुपयांचा (Pune Crime) मुद्देमाल जप्त केला.

 

राजू प्रतापराम गुर्जर Raju Pratapram Gurjar (वय 22, सध्या रा. कुसाळकर चौक, जनवाडी, गोखलेनगर मुश रा. पाली राजस्थान) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुर्जर हा हिराबाग चौकात अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅग तपासली असता त्यामध्ये अफू सापडली. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये किंमत आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे अंमली पदार्थ आणले कोठून, तो कोणाला हे विकणार होता, त्याचे साथीदार कोण आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime)

ही कारवाई  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosale),
उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनील कुलकर्णी, अजय जाधव, महेश बामगुडे, अजय थोरात,
राहुल मखरे, अमोल पवार, इम्रान शेख आदींनी ही कारवाई केली.

 

 

Web Title :- Pune Crime | A young man who came from Rajasthan to Pune to sell opium was arrested by the pune police crime branch the valuables worth 8.5 lakhs were seized

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा