Shoaib Akhtar | कटरीना कैफ आहे ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची बहिण? खेळाडूने स्वत: सांगितली ही गोष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला बॉलीवुडचे चित्रपट आणि अ‍ॅक्टर्स आवडतात. शोएब अख्तर (Shoaib Akhtar) ने इंस्टाग्रामवर स्पोर्ट्सक्रीडासोबत चर्चा करताना म्हटले की, माझ्या जीवनावर एक बायोपिक चित्रपट व्हावा, ज्याचा हिरो बॉलीवुड स्टार सलमान खान (Salman Khan) असावा. याशिवाय त्याने एक बॉलिवुड अभिनेत्री त्याची बहिणी असल्याचे सुद्धा सांगितले. shoaib akhtar said my sister katrina kaif is my favourite bollywood actress

या अभिनेत्रीला म्हटले बहिण

या मुलाखतीदरम्यान शोएब अख्तर (Shoaib Akhtar) ने आणखी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तुझी फेव्हरेट बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस कोण आहे.
तेव्हा शोएबने म्हटले की माझी फेव्हरेट अ‍ॅक्ट्रेस कटरीना कैफ (Katrina Kaif) आहे.
या दरम्यान त्याने कटरीना कैफ आपली बहिण असल्याचे सांगितले.
शोएबने म्हटले, माझी फेव्हरेट अ‍ॅक्ट्रेस माझी बहिण कटरीना कैफ आहे.

या प्रश्नांना सुद्धा दिली उत्तरे, जाणून घ्या

प्रश्न – IPL आणि PSL पैकी चांगली लीग कोणती आहे?
उत्तर – PSL चांगली लीग आहे.

प्रश्न – सध्या सर्वात जास्त अंडररेटेड खेळाडू कोण आहे?
उत्तर – जॉनी बेयरस्टो.

प्रश्न – गोलंदाजीसाठी सर्वात अवघड फलंदाज कोण होता?
उत्तर – मुथैया मुरलीधरन.

प्रश्न – सध्याचे 3 फलंदाज ज्यांना आऊट करण्याची इच्छा आहे?
उत्तर – बेन स्टोक्स, विराट कोहली आणि बाबर आझम.

प्रश्न – पाकिस्तानचा सर्वात चांगला फलंदाज कोण आहे?
उत्तर – बाबर आझम.

Web Title : shoaib akhtar said my sister katrina kaif is my favourite bollywood actress

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Vikas Lavande | राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारचा 42 कोटींचा महसूल बुडविला’

Brain Stroke | ‘या’ 7 वाईट सवयींमुळे तरूणांमध्ये वाढत आहे ब्रेन स्ट्रोकचा धोका, एक्सपर्टने सांगितले बचावाचे उपाय