धक्कादायक….14 वर्षीय पुतणीवर बलात्कार,शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे घटनेला वाचा

नागपूरः पोलीसनामा आॅनलाईन

आर्थिक परिस्थिती गरीब असल्याने शिक्षणासाठी काकाच्या घरी वास्तव्यास असलेल्या 14 वर्षीय पुतणीवर वडिसांसमान असलेल्या काकानेच बलात्कार केल्याची धक्कादयक घटना शहरात समोर आली आहे.या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी नराधम काकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेषराव (वय 43) असे आरोपीचे नाव आहे. शाळेतील शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे या घटनेला वाच फुटली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 14 वर्षाची पीडित मुलगी ही मूळची भीवापूरची असून, तिचे आई-वडील शेतमजुर आहेत. वडीलाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे अभ्यासात हुशार असलेल्या पीडित मुलीला शिक्षणासाठी काकाकडे पाठविले. आरोपी शेषराव हा धनाढ्य असून, मेडिकल कॅम्प आयोजित करुन तो पैसा कमवितो. त्याला पत्नी व मुलगा आहे. त्याच्याकडे मृत पावलेल्या मोठ्या भावाची 19 वर्षाची मुलगीसुद्धा शिक्षणासाठी आहे.
[amazon_link asins=’B00Y8B8G26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’720a6742-9319-11e8-b3e4-a5bc8d3b958a’]
आरोपी गेल्या काही महिन्यांपासून अश्‍विनीशी अश्‍लिल चाळे करीत होता. रात्रीच्या सुमारास अश्‍विनीच्या रूममध्ये घुसून तिचे लैंगिक शोषण करीत होता. अश्‍विनीने लैंगिक शोषणास नकार दिल्यास शिक्षण बंद करून वडीलाकडे शेतीच्या कामासाठी पाठविण्याची धमकी काका देत होता. त्यामुळे घाबरलेली अश्‍विनी गप्प राहून अत्याचार सहन करीत होती.

शिक्षिकेने फोडली प्रकरणाला वाचाः

एरवी वर्गात सर्वसामान्य असणारी पीडित मुलगी मागील काही दिवसांपासून अबोल होती. ही बाब शिक्षिकेच्या लक्षात आली. शिक्षिकेने तिची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर अश्‍विनी ढसाढसा रडायला लागली. तिने काकाचे कुकृत्य शिक्षिकेला सांगितले. शिक्षिकेने मुख्याध्यापकाला सांगितले. त्यांनी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शेषरावला अटक केली.