धक्कादायक ! 2 शिक्षकांनी 12 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टला दिले गरम लोखंडाचे चटके, नातेवाईकांचा संताप

बिहार : वृत्तसंस्था – बिहार येथील बेगुसराय भागात एक गुरु शिष्याच्या नात्याला कलंक लावणारी अशी निर्दयी घटना घडली आहे. तेथील एका १२ वर्षीय विद्यार्थ्याला शाळेच्या दोन शिक्षकांनी अतिशय गंभीर आणि धक्क्कादायक छळ केल्याचे उघड झाले आहे. अतिशय छोट्या कारणावरून त्या शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टला गरम लोखंडाने चटके दिले आहे. असा आरोप १२ वर्षीय पीडित विद्यार्थी आणि त्याच्या नातेवाईकांनी पोलिसात केला आहे. राहुल कुमार आणि चंदन कुमार असे त्या शिक्षकाचे नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना शनिवारी घडली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने सर्वच शाळा हॉस्टेल बंद केले आहे, तर कोरोना नियमने धुडकावून अशी घटना घडल्याने शहरात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या शिक्षकांच्या कृत्यामुळे १२ वर्षीय तो मुलगा गंभीर जखमी झाला आहे. यामुळे नातेवाईक आणि स्थानिकांमध्ये संताप पसरला आहे. तर, चांदपूरा चित्तरंजन येथील रहिवासी रणवीर सहानी यांच्या पत्नी सुधा देवी यांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा माझा मुलगा घरी परतला आणि आंघोळीसाठी गेला होता. तेव्हा त्याने कपडे हटवल्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्टला चटके दिल्याचं दिसून आलं. त्यात रक्त चिघळलं होतं. तेव्हा मुलाला विचारलं असता त्याने जे सांगितलं तेव्हा मी हादरले. १२ वर्षीय विद्यार्थी प्रेमने त्याच्या आईला सांगितलं की, हॉस्टेलमध्ये शिक्षकांनी गरम लोखंडाने चटके दिले होते.

दरम्यान, पीडित विद्यार्थी पीसी हायस्कूलच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. लॉकडाऊन असतानाही त्यांची शाळा सुरूच होती. लॉकडाऊन काळात मुलाला हॉस्टेलला ठेवलं होतं. याठिकाणी राहुल कुमार आणि चंदन कुमार या शिक्षकांच्या देखरेखीखाली त्याचे शिक्षण सुरू होते. आरोपी शिक्षक राहुल कुमार आणि चंदन कुमार यांना राग अनावर झाला. त्यावेळी या दोघांनी विद्यार्थ्यांच्या पार्श्वभागावर गरम लोखंडी सळीने चटके दिले. त्यावेळी विद्यार्थ्याला भाजल्यामुळे त्याला सहन झालं नाही. तेव्हा शिक्षकांनी घडलेला प्रकार जर कोणाला सांगितला तर शाळेतून नाव काढून टाकू अशी धमकी दिली. या घटनेवरून नातेवाईकांनी शाळेत जाऊन गोंधळ घेतला. आणि याबाबत माहिती पोलिसांना दिली. यावरून त्या २ शिक्षकांना पोलिसांनी अटक केलीय.