धक्कादायक….प्रेमविवाह केल्यामुळे जातपंचायतीने टाकलं वाळीत 

नाशिक : पोलीसनामा आॅनलाईन

जातपंचायतीच्या विरोधात सरकारने  कठोर भूमिका घेतली असताना देखील, राज्यामध्ये अनेक समाज जातीच्या साखळदंडात अडकलेले दिसत आहेत. प्रेमविवाह केला म्हणून एका कुटुंबाला वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात घडली आहे. वैदू समाजाच्या जातपंचायतीमध्ये हा प्रकार घडाला आहे.
[amazon_link asins=’B07DWS5V4Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d2552e5-8763-11e8-a9be-1fd4faf665c1′]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनेश पवार या तरुणाने स्वजातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्याने वैदू समाजाच्या जातपंचायतीने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकलं आहे. सटाणा शहराजवळील मळगाव येथे वैदू समाजाची दहा ते बारा घरं आहेत. याच ठिकाणी राहणाऱ्या दिनेश पवार याने सात महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. मात्र वैदू समाजाच्या स्थानिक जातपंचायतीने या जोडप्याला समाजात घेण्यास नकार दिला.

सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रेमविवाह केल्यामुळे दिनेशला जर घरामध्ये घेतलं तर तुम्हाला देखील समाजातून बहिष्कृत करु असा दम जातपंचायतीच्या कारभाऱ्यांनी पवार कुटुंबाला दिला आहे. त्यामुळे विनाकारण आपल्या घरच्यांना त्रास नको म्हणून दिनेस आणि त्याची पत्नी सुनंदा दोघे मालेगावमध्ये वास्तव्यास गेले आहेत. दिनेशच्या वडिलांना तोंडाचा कॅन्सर असल्याने त्यांना भेटण्यासाठी तो प्रयत्न करत होता. यासाठी घरच्यांनी जातपंचायतीकडे मुलाला घरी आणण्याची परवानगी मागितली. मात्र याच्या मोबदल्यात जातिच्या दलालांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. दिनेशने जर जातपंचायतीला एक लाख रुपयांची रक्कम दिली तर दिनेशला घरात घेण्याची परवानगी देण्यात येईल असे म्हटले आहे.
[amazon_link asins=’B01HL0OOU8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’82fde73b-8763-11e8-8285-21384d91aec7′]

या संपूर्ण त्रासाला कंटाळल्यानंतर शेवटी दिनेश आणि त्यांची पत्नी सुनंदा यांनी मालेगाव येथे महिला समुपदेशन केंद्रात गेले. या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्यानुसार दिनेशने सटाणा पोलीस ठाण्यात जातपंचायतीच्या विरोधात तक्रार दिली आहे.