धक्कादायक ! विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

कन्नड (औरंगाबाद ) : पोलीसनामा ऑनलाईन

रोडरोमियोंकडू होणाऱ्या त्रासाला कंटाळून बारामती तालक्यातील एका महाविद्यालयीन तरुणीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एका मुलीचा विनयभंग केल्याने तरुणीने आत्महत्या केली. या घटनेमुळे कन्नड तालुक्यातील तांदुळवाडीमध्ये खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04a3d405-a6ca-11e8-b74b-bde1276112fb’]

कन्नड तालुक्यातील तांदुळवाडी येथ राहणाऱ्या प्रियंका बजरंग मोरे (वय-१७) या मुलीचा गावातीलच दोन मुलांनी घरात घसुन तिचा विनयभंग करुन त्रास दिला. त्यामुळे प्रियंका हिने राहत्या घऱातील स्वयंपाकत खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.२२) सकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि.२१) प्रियंका बजरंग मोरे (१७) ही आई-वडील शेतात गेल्याने घरात एकटीच होती. यावेळी गावातीलच हेमंत साहेबराव सावंत व ज्ञानेश्वर गोटीराम गोडसे हे प्रियंकाच्या घरात घुसले. एकटी असल्याचा फायदा घेत त्यांनी तिचा विनयभंग केला. मात्र, प्रियंकाने हिंमत करत त्यांच्या हाताला झटका देऊन तेथून पळ काढत थेट शेत गाठले. शेतात जाताच तिने आई-वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली.
[amazon_link asins=’B075X5PCX2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’224d0f08-a6ca-11e8-a8f2-05178cb4b896′]

या घटनेमुळे प्रियंका अत्यंत तणावाखाली होती. यानंतर बुधवारी (दि.२२) सकाळी ६ वाजेच्या दरम्यान प्रियंकाने स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत बजरंग मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रोहीत बेंबरे करीत आहेत.

Loading...
You might also like