धक्कादायक… प्रेम संबंधास विराेध केल्यामुळे तरूणीचा बलात्कार करून खून

जत : पाेलीसनामा ऑनलाईन

एकाेणवीस वर्षीय तरूणीवर बलात्कार करून खून केल्याची धक्कादायक घटना जत येथे घडली अाहे. श्रीशैल बसगाेडा दाशाळ (वय २०) असे अाराेपीचे नाव असून यास उमदी पाेलीसांनी पुणे येथे जेरबंद केले. प्रेम संबंधास विराेध केल्याने बलात्कार करून खून केल्याची कबूली अाराेपीने पाेलीसांना दिली अाहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5041435a-8783-11e8-87ae-59e6f0c81fb3′]

या बाबत सविस्तर वृत्त असे की, दाशाळचे मौत युवती साेबत प्रेमसंबंध होते. अलिकडे काही दिवसात ती दाशाळला टाळत होती. त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता. घटनेच्या दिवशी युवती ही घरी एकटीच असल्याचे पाहुन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यावेळी तीने विरोध केला. मात्र त्याने तिला शेजारील ऊसात उचलून नेले. सुरूवातीस तिला जबर मारहाण केली त्यांनंतर तिच्यावर तिथेच बलातकार केला. त्यावेळी तरूणीने पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली.आपली आब्रु जाईल व पोलीस कारवाई होईल या भितीपोटी दाशाळने जागेवरच तरूणीचा गळा आवळून खून केला. असा कबुली जबाब त्याने पोलीसांत दिला आहे.

श्रीशैल दाशाळ (वय-२०) यानेच बलात्कार व खून केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक त्याच्या मागावर होते. तो पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीतील एका कारखान्यात काम करित असल्याचे समजले. त्यानुसार सपोनि शिंदे यांनी स्वत: पथकासह पुणे येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले. त्यास उमदी येथे आणून रितसर अटक केली. अशी माहिती प्रभारी पोलिस उपाधिक्षक अमरसिंह निबाळकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी उमदीचे सपोनि भगवान शिंदे उपस्थित होते.