Patna : तिने पळून जाण्यास दिला नकार दिल्याने त्याने स्वतःवरच झाडली गोळी

पाटणा : वृत्तसंस्था

पाटणा येथील नौबतपुरा पोलीस स्टेशन हद्दीत चिराऊरा गावाजवळ एक धक्कादायक प्रकार घाला आहे. विवाहित प्रियसीने प्रियकरासोबत पळून जाण्यास नकार दिल्याने चालत्या गाडीत प्रियकराने गोळी झाडून आत्महत्या केली. सुजीत कुमार (२४) असे मृत युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुजीतचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या तरुणीचा विवाह मागील महिन्यात एका दुसऱ्या तरुणाशी झाला. सुजीतने त्या तरुणीला भेटायला बोलावले . त्यानुसार तरुणी बुधवारी दुपारी तिच्या स्कुटीवरून आली. तिने आपली स्कुटी फुलवारीशरीफ येथे पार्क केली आणि सुजीतसोबत ती कारमधून निघाली. कारमधून दोघे जात असताना सुजीतने तिच्याकडे पळून जाण्याचा विषय काढला पण तीने नकार दिल्यामुळे त्याने सरळ बंदूक काढाली आणि स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे हादरलेल्या तरुणीने स्थानिक नागरिकांच्या मदातीने सुजीतला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सुजीतचा मृत्यू झाला होता. सुजीतच्या कुटुंबियांनी त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे पण यासंबंधी कोणताही पुरावा मिळालेला नाही. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक देशी पिस्तुल जप्त केले. सुजीत ने यावर्षीच ग्रॅज्युएशनची परिक्षा दिली होती.