Lockdown वाढवण्यात यावा की नको, मंत्र्यांमध्येच मतभिन्नता? आज होणार निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे 1 जूननंतर लॉकडाऊन हटवायचा की वाढवायचा याबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या आज गुरुवारी (दि. 27) होणा-या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या वेगवेगळ्या मतभिन्नता सध्या सुरू असलेल्या कडक निर्बंध नियमावलीबाबत समोर येत आहे.

गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे नियमात शिथिलता मिळावी, अशी मागणी होत आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याने तसेच मृत्यूचे प्रमाण देखील वाढत असल्याने सध्याचे कडक निर्बंध पुढे आणखी काही दिवस लागू करावी का याबाबत मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणार आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने जिथे रुग्ण संख्या कमी आहे, अशा भागांमध्ये शिथिलता मिळावी अशी मागणी आहे. याबाबत राज्यातील काही मंत्री देखील सकारात्मक आहेत. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करूनच अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. दुसरीकडे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे. पण या जिल्ह्यांमधील सर्वच तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या वाढते असे नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात सरसकट कडक निर्बंध नियमावली लागू करू नये असे म्हटले आहे.