Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरचा हॉट अंदाज; नेटेट टॉपने वेधले सर्वांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही नेहमी तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते. श्रद्धाचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या हटके अंदाजमुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे. अनेक चित्रपटांमध्ये काम करणारी श्रद्धा (Shraddha Kapoor) ही नेहमी तिच्या फॅशनमुळे नावाजली जाते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तिने घातलेल्या नेटेट टॉपने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पापाराझींना हसून पोज देणाऱ्या श्रद्धा कपूरच्या हॉटनेसमुळे (Shraddha Kapoor Hotness) सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने नुकतीच तिची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे (Tejaswini Kolhapure ) हिच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. एअरलाईन्स सोडून सिनेविश्वामध्ये येणाऱ्या तेजस्विनीने घरातील काही खास लोकांसाठी पार्टी ठेवली होती. यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूर सोबतच तिचे भाऊ बहिण देखील उपस्थित होते. तसेच श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) देखील उपस्थित होत्या. त्यांचे सौंदर्य पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी उपस्थित या सर्वांनी पापाराझींना हसून पोज दिल्या. पण या सगळ्यामध्ये लक्षवेधी ठरत होती ती अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची दिलखेचक स्टाईल.
https://www.instagram.com/p/CoRNjJsJGuK/?igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने सिल्व्हर रंगाचा आऊटफिट स्टाईल केला होता. तिने नेटेट टॉप (Shraddha Kapoor In Net Dress) परिधान केला असून सोबतच बॅगी स्टाईल पॅन्ट स्टाईल केली होती. ग्लोईंग मेकअप सोबत तिने केस मोकळे सोडले होते. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा हा अंदाज चाहत्यांना आवडला असून तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही शेवटची अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) ‘तू झुठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटामध्ये झळकली होती. लवकरच तिचा ‘स्त्री 2’ हा चित्रपट (Stree 2 Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


https://www.instagram.com/p/Cikgo31IWZ5/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली