श्री मुलीकादेवी महाविद्यालय निघोज येथे कवी विंदा करंदीकर काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

निघोज : पोलीसनामा ऑनलाइन – निघोज येथील श्री मुलीकादेवी महाविद्यालय निघोज या महाविद्यालयात कवी विंदा करंदीकर काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेकंनी यात आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कवी महाबली मिसाळ व ग्रामीण साहित्याचे अभ्यास असणारे कवी मनोज दिक्षित उपस्थिती होते. ह्या कार्यक्रमास मुलीकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ एस के आहेर सर उपस्तित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. शिवाय अनेक कवितांनी विद्यार्थी भारावून गेले. मोठे संख्येने कविता ऐकण्यासाठी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपवले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाय आपल्या काही रचनाही ऐकवल्या. त्यापैकी महबली मिसाळ यांच्या सरकार, श्रावण आला आहे , भेट तू ह्या कवितांना उस्फुर्त दाद मिळाली. तर कवी मनोज दीक्षित ह्यांची पतंग ही मार्मिक कविता विद्यार्थ्यांना विशेष भावली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा . कवडे यांनी केले. तर आभार प्रा. एस बी पवार यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . तुषार ठुबे यांनी केले. तसेच यापुढेही असेच कार्यक्रम घेऊ असे प्रतिपादन प्राचार्य आहेर यांनी केले.