Shrimant Dagdusheth Ganpati Pune | दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून अथर्वशीर्ष पठण, बुधवारी पुण्यात मध्यभागातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shrimant Dagdusheth Ganpati Pune | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून बुधवारी (20 सप्टेंबर) पहाटे उत्सव मंडप परिसरात सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात हजारो महिला भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. शिवाजी रस्त्यावरील (Shivaji Road Pune) जिजामाता चौक ते रामेश्वर चौक बुधवारी पहाटे वाहतुकीस बंद राहणार आहे. हा बदल कार्यक्रम संपेपर्यंत असणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Traffic Vijaykumar Magar) यांनी केले आहे. (Shrimant Dagdusheth Ganpati Pune)

वाहतूक व्यवस्थेतील बदल पुढीलप्रमाणे

बुधवारी पहाटे शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते रामेश्वर चौक हा वाहतुकीस बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा, जिजामाता चौक, तसेच डावीकडे वळून गणेश रस्ता, फडके हौद चौक, देवजी बाबा चौक, उजवीकडे वळून हमजेखान चौक, महाराणा प्रताप मार्गावरुन गोविंद हलवाई चौक, उजवीकडे वळून गोटीराम भैय्या चौकमार्गे पुन्हा शिवाजी रस्त्यावर येऊन स्वारगेटकडे जावे. (Shrimant Dagdusheth Ganpati Pune)

Advt.

यासोबतच अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक वाहतुकीस बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना अप्पा बळवंत चौक,
बाजीराव रस्ता, फुटका बुरुज मार्गे गाडगीळ पुतळा चौक, उजवीकडे वळून जिजामाता चौकातून डावीकडे वळून पुढे जावे.

तसेच लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक, सोन्यामारुती चौक दरम्यानची वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.
वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून डावीकडे वळावे,
मिर्झा गालीब रोड जंक्शन येथून उजवीकडे वळुन मंडईतून डावीकडे वळून शिवाजी रोडने पुढे जावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav – Traffic Changes | गणपतीच्या आगमनानिमत्त पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग