Shrirang Barne | अच्छे दिन! श्रीरंग बारणेंची संपत्ती 5 वर्षात वाढली 29,42,81,497 रूपयांनी, कुटुंबाची संपत्ती 132 कोटी, 58 व्या वर्षी झाले 10 वी पास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shrirang Barne | आपला होणारा आमदार, खासदार किती शिकला आहे, त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, त्याने आपली सेवा करता-करता किती मेवा कमावला, इत्यादी माहिती मतदारांना त्याने उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून मिळते. आज मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीरंग बारणे यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी १० वी परीक्षा पास केली आहे. त्यांच्या कुटुंबाची एकुण संपत्ती १३२ कोटींची आहे, इत्यादी माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. (Maval Lok Sabha)

यापूर्वी दोन वेळा खासदार झालेले महायुतीचे शिवसेनेचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यात २०२२ मध्ये दहावीची परीक्षा दिल्याचे आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. चिंचवडच्या फत्तेचंद जैन विद्यालयात बारणेंनी ही परीक्षा दिली होती.

बारणे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची दिलेली माहिती –

 • जंगम मालमत्ता : १५ कोटी ८२ लाख १० हजार
 • स्थावर मालमत्ता : ९० कोटी ७३ लाख ३९ हजार
 • एकूण : १०६ कोटी ५५ लाख ५० हजार रुपये

पत्नी सरिता बारणे यांची संपत्ती

 • जंगम मालमत्ता : १ कोटी १८ लाख ६६ हजार
 • स्थावर मालमत्ता : २४ कोटी ३६ लाख ७४ हजार रुपये
 • एकूण : २५ कोटी ६८ लाख ४१ हजार रुपये
 • बारणे कुटुंबीयांची एकूण संपत्ती : १३२ कोटी २३ लाख ९१ हजार ६३१ रुपये
 • पाच वर्षांत वाढलेली संपत्ती : २९ कोटी ४२ लाख ८१ हजार ४९७ रुपये
 • बारणे यांच्याकडे मर्सिडीझ बेंझ आणि टोयाटो फॉच्र्युनर या २ मोटारी आहेत.
 • हिरेजडीत अंगठी ११ लाख ५५ हजाराची, तर पत्नी सरिता यांच्याकडे पाच लाख ५० हजारांच्या कर्णकुड्या, ५१ लाखांचे ७४३ ग्रॅम सोने आहे. तर ४७० ग्रॅमचे ३२ लाख ५० हजारांचे सोने आहे.
 • ३५ हजारांचे एक वेब्ली अँड स्कॉट बनावटीचे रिव्हॉल्व्हरही आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lonikand Pune Crime | पुणे : विवाहितेला इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज करुन बदनामी करण्याची धमकी

Pune News | छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन