‘दृश्यम’ फेम श्रिया सारनच्या ‘हॉट रेन डान्स’नं सोशलचा ‘पारा’ वाढला (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दृश्यम सिनेमातील अभिनेत्री श्रिया सारन हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. सध्या हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतोय. याचे कारण म्हणजे श्रेयाने केलेला रेन डान्स.

व्हिडीओत दिसत आहे की, श्रिया आपल्या बाल्कनीत रेन डान्स करतेय. रेन डान्स करताना श्रिया शॉर्ट ड्रेसमध्ये दिसून आली. आपल्या हॉट लुक आणि हटके अंदाजात श्रिया पावसाचा आनंद घेत हवा तसा डान्स करतेय.

श्रियाच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीवर अनेक चाहत्यांनी कमेंट केलीय. चाहत्यांना श्रियाचा रेन डान्सवाला लुक खूप आवडलाय असं दिसतंय. काही चाहत्यांनी तिच्या रेन डान्सचे कौतुक केलेय तर काहींनी तिच्या हॉट लुकचे. श्रियाच्या लाखो चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहिलाय. श्रियाचे याआधीही डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

क्युट आणि सुंदर दिसणारी श्रिया रेन डान्स करताना भलतीच हॉट दिसतेय. चाहत्यांनी श्रियाच्या रेन डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केलाय. श्रिया पती आंद्रेई कोस्चीवसोबत बार्सिलोनामध्ये सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

 

Loading...
You might also like