Shubhangi Atre | ‘या’ कारणामुळे लग्नाच्या 19 वर्षानंतर पतीपासून वेगळी झाली शुभांगी अत्रे

पोलीसनामा ऑनलाइन : Shubhangi Atre | ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून अंगुरी भाभी अर्थातच अभिनेत्री शुभांगी अत्रे आज घराघरात पोहोचली आहे. शुभांगी ने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक अशी वेगळी जागा निर्माण केली आहे. आज शुभांगीची एक झलक पाहण्यासाठी चाहते तिची आतुरतेने वाट पाहत असतात. भाभीजी घर पर है या मालिकेमुळे तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. शुभांगीचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. आता शुभांगीच्या चाहत्यांसाठी एक नाराज करणारी बातमी आहे. शुभांगी लवकरच पतीपासून विभक्त होणार आहे. (Shubhangi Atre)

अभिनेत्री शुभांगी नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांना देखील नेहमीच तिच्या खाजगी आयुष्या बाबत जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली असते. आता शुभांगी तिचा पती पियुष पुरे पासून विभक्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरापासून शुभांगी पतीपासून वेगळी राहत होती. (Shubhangi Atre)

तब्बल लग्नाच्या 19 वर्षानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. 2003 मध्ये शुभांगी ने पियुष पुरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. पियुष हा मार्केटिंग क्षेत्रात काम करतो. त्या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे. याबाबत शुभांगीला विचारले असता ती म्हणाली, “आम्ही आमचे नाते टिकवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले मात्र त्यात आम्हाला यश आले नाही. आमच्यातील परस्पर मतभेदामुळे आम्ही विभक्त झालो”.

Web Title : Shubhangi Atre | bhabhiji gharpar hain fame anguri bhabhi aka shubhangi atre separated from husband

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे