Sidhu Moosewala Murder Case | सलमान खानची सुद्धा लॉरेन्स बिश्नोईने करून घेतली होती रेकी, सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील पकडलेल्या शूटरचा खुलासा

चंदीगड : सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी (Sidhu Moosewala Murder Case) दीपक मुंडी (Deepak Mundi) सह अटक करण्यात आलेल्या कपिल पंडित (Kapil Pandit) याने लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) च्या सूचनेनुसार बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Bollywood Actor Salman Khan) ला निशाणा बनवण्यासाठी मुंबईत रेकी (Reiki) केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. रेकी करणार्‍या लोकांच्या राहण्याचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. सलमान खानला मारण्यासाठी संपत नेहरा (Sampat Nehra) च्या साथीने ही योजना आखण्यात आली होती. (Sidhu Moosewala Murder Case)

 

 

रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना पंजाबचे डीजीपी गौरव यादव (Punjab DGP Gaurav Yadav) म्हणाले की, सलमान खान हल्ल्याप्रकरणी हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) यापूर्वी गुंड संपत नेहराला अटक केली होती. याप्रकरणी पोलीस कपिल पंडित यांचीही सखोल चौकशी करत आहेत.

 

गौरव यादव यांनी सांगितले की, मूसेवाला हत्याकांडातील आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी 23 आरोपींना अटक केली आहे. याशिवाय 35 जणांची नावे आहेत. यापूर्वी चकमकीत दोन आरोपी शूटर ठार झाले आहेत. (Sidhu Moosewala Murder Case)

 

डीजीपी म्हणाले की, राजिंदर उर्फ जोकर (Rajinder Alias Joker) आधीच नेपाळमध्ये राहत होता, तर कपिल आणि दीपक मुंडी पंजाबच्या आधी राजस्थान, नंतर हरियाणा, यूपी आणि बिहारमार्गे पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) पोहोचले होते. तेथून ते नेपाळ सीमेवर (Nepal Border) पोहोचले. दीपक मुंडी, राजिंदर जोकर आणि कपिल पंडित यांना नेपाळमधून बनावट पासपोर्टद्वारे दुबईला जायचे होते, कारण त्यांना तेथे सेटल करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तिन्ही आरोपी नेपाळहून बँकॉकमार्गे दुबईला जाण्याच्या बेतात होते.

डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की, त्यांना मानसा न्यायालयात (Mansa Court)
हजर केल्यानंतर त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आली असून
आता त्यांची चौकशी केल्यानंतर मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
मूसेवालाच्या वडिलांच्या हत्येमध्ये सिंगर इंडस्ट्रितील दिग्गजांचा सहभाग असल्याच्या आरोपांबाबत
डीजीपी म्हणाले की, त्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी सर्व आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस मजबूत प्रकारे न्यायालयात बाजू मांडतील.
पोलीस लवकरच हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी बराड (Goldie Barad) याला अटक करून
पंजाबमध्ये आणतील असा दावाही डीजीपींनी केला आहे.

 

Web Title :- Sidhu Moosewala Murder Case | chandigarh punjab salman khan
murder conspiracy punjab police revealed moose wala shooter sampat nehra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा