Shivsena On Nitesh Rane | नितेश राणे म्हणजे ‘चायना आयटम’, शिवसेनेने ‘त्या’ वक्तव्यावरून हिणवले

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena On Nitesh Rane | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हिंदुहृदयसम्राट म्हणत त्यांची तुलना थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी करणारे नारायण राणे (Narayan Rane) यांचे पूत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. आज नांदेड (Nanded) येथे आयोजित शिवसेनेच्या (Shivsena) मेळाव्यातही नितेश राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. नितेश राणे म्हणजे ‘चायना आयटम’ असल्याची टीका शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात (Baban Thorat) यांनी (Shivsena On Nitesh Rane) केली.

 

बबन थोरात यांनी म्हटले की, सध्याचे राजकारण केवळ मुंबई महापालिका निवडणुका (Mumbai Municipal Corporation Elections) डोळ्यासमोर ठेऊन केले जात आहे. 25 वर्षापासून शिवसैनिकच (Shiv Sainik) मुंबईच्या हितासाठी रात्रीचा दिवस करत आहे. त्यामुळे मुंबईकर आणि शिवसेना हे वेगळे नाते आहे. कुणीही ते तोडण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला आपले हित कशात आहे, याची जाणीव आहे. मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवाच फडणार, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

 

थोरात यांनी म्हटले की, पक्ष संघटन आणि कठीण परस्थितीमध्ये मजबूतीकरण यासाठी शिवसेनेकडून स्थानिक पातळीवरही लक्ष केंद्रीत केले जात आहे. त्यानुसारच नांदेडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला आहे. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सदैव तत्पर रहा. (Shivsena On Nitesh Rane)

दरम्यान, भाजपाच्या (BJP) एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचा हिंदुहृदयसम्राट म्हणून उल्लेख केला.
गेल्या काही दिवसांमधील देवेंद्र फडणवीस यांचे कार्य पाहिले तर तेच खरे हिंदुहृदयसम्राट,
असे नितेश राणे यांनी म्हटले होते.
यावरून शिवसेनेत संतप्त पडसाद उमटत आहेत.

 

Web Title :- Shivsena On Nitesh Rane | nitesh ranes that statement was
slammed by shivsena as china item

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा