Gold Silver Price : आज 117 रुपयाने महागलं सोनं, चांदीचे सुद्धा भाव वाढले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज जागतिक बाजारांनुसार आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेल्या घसरणीने राष्ट्रीय राजधानीत सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी नोंदली गेली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमतीत 117 रुपयांची वाढ झाली आणि तो 48,332 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोने मागील व्यवहाराच्या सत्रात 48,215 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

541 रुपयांनी महागली चांदी
चांदीत मागील व्यवहाराच्या सत्रात 64,116 रुपये प्रति किलोग्रॅमच्या तुलनेत आज चांदीचा भाव 541 रुपयांनी वाढून 64,657 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी अनुक्रमे 1,834 अमेरिकन डॉलर प्रति औंस आणि 25 अमेरिकन डॉलर प्रति औंसच्या स्तरावर होते.

किंमतीत चढ-उताराचे प्रमुख कारण
अमेरिकन डॉलरमध्ये चढ-उतार, वाढत असलेली कोरोनाची प्रकरणे आणि याच्याशी संबंधीत प्रतिबंध, प्रमुख अर्थव्यवस्थांमधून संमिश्र आर्थिक डाटा आणि अतिरिक्त प्रोत्साहन उपायांनी सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ-उतार होतो. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, मागील काही आठवड्यांमध्ये सोन्याच्या किंमतीवर सर्वात मोठा कारक व्हॅक्सीनच्या आघाडीवर प्रगती आहे.

आर्थिक सुधारणेमुळे यावर्षी वाढू शकते सोन्याची मागणी
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (डब्ल्यूजीसी) च्या एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस महामारीच्या प्रकोपातून सावरण्यासह भारतात 2021 च्या दरम्यान ग्राहक भावनांमध्ये सुधारणा होत आहे आणि सोन्याची मागणी सकारात्मक दिसत आहे. रिपोर्टनुसार, नोव्हेंबरमध्ये धनत्रयोदशीचे सुरूवातीचे आकडे सांगतात की, दागिन्यांची मागणी सरासरीपेक्षा कमी होती, परंतु यामध्ये मागच्या वर्षीच्या दुसर्‍या तिमाही (एप्रिल-जून 2020) च्या खालच्या स्तराच्या तुलनेत खुप सुधारणा झाली. रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, जागतिक आर्थिक वाढीत काही काळासाठी आपल्या पूर्ण क्षमतेच्या तुलनेत सुस्ती कायम राहील, परंतु मागील काही काळापासून सोन्याच्या किंमतीमध्ये स्थिरतेमुळे ग्राहकांना खरेदीची संधी वाढेल. डब्ल्यूजीसीच्या रिपोर्टनुसार चीन सारख्या देशांमध्ये आर्थिक सुधारणा शक्य आहेत, ज्यास 2020 च्या सुरूवातीला मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले होते.