Simrat Kaur | ‘गदर 2’ चित्रपटातील अभिनेत्रीला बोल्ड सीनमुळे केले जातेय ट्रोल; सिमरत कौरने दिले उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या बॉलीवुडच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ हा चित्रपट (Gadar 2 Movie) देखील येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटामध्ये अभिनेता सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल (Amisha Patel) व अभिनेत्री सिमरत कौर (Simrat Kaur) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. सिमरत कौर आणि तिचे चाहते या आगामी चित्रपटाबाबत उत्सुक आहेत. मात्र सिमरतने या पूर्वीच्या चित्रपटांमध्ये केलेल्या बोल्ड सीनमुळे (Simrat Kaur Bold Scene) तिला सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केले जात आहे. सिमरतचे आधीच्या चित्रपटातील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर तिने मौन सोडले असून ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले आहे. अभिनेत्री सिमरत कौर (Simrat Kaur) हिने लोक मला नेहमीच ट्रोल करत असतात असे सांगितले आहे.

अभिनेत्री सिमरत कौर हिने या आधी तेलुगू चित्रपटामध्ये काम केले आहे. तिने ‘डर्टी हरी’ या चित्रपटामध्ये (Dirty Hari Movie) देखील काम केले होते. तिचे या चित्रपटामध्ये अनेक इंटिमेट सीन (Simrat Kaur Intimate Scene) व बोल्ड सीन आहेत. आता लवकरच सिमरत ‘गदर 2’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मात्र तिचे हे आधीचे इंटिमेट सीन व्हायरल होत असून नेटकरी तिला जबरदस्त ट्रोल (Simrat Kaur Troll) करत आहेत. यावर सिमरतने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. ती म्हणाली की, “लोक मला नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी ट्रोल करत असतात. मी एक इमोशनल आणि सेन्सिटिव्ह व्यक्ती आहे. पण मी जेव्हा अभिनेत्री नव्हते तेव्हा मी सुद्धा लोकांना जज करायचे आणि माझे मत सोशल मीडियावर मांडत होते. पण मला माहिती होते या कमेंटचा लोकांवर किती परिणाम होणार आहे. त्या व्यक्तीला सोशल मीडियावरील विचार दुखवू शकतात. यामुळे आता सोशल मीडियावर मतं मांडताना किंवा बोलताना मी विचार करुन बोलते.“

पुढे सिमरत म्हणाली की, “मला अशी अपेक्षा नाही की माझ्याबद्दल लोकांची मने एका रात्रीत बदलावी.
प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. प्रत्येकजण त्याचे विचार सोबत घेऊन जात असतो.
हा एका प्रकारचा व्यवसाय आहे जो आज एका गोष्टीसाठी तर उद्या एका गोष्टीसाठी आयुष्यभर चालत असतो.
माझा ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा लोकांना हा चित्रपट आणि त्यातील माझी भूमिका (Simrat Kaur In Gadar 2) नक्कीच आवडेल. माझ्यासाठी ‘गदर 2’ चा भाग असणं हे कोणत्याही नकारात्मक गोष्टींपेक्षा मोठं आहे.“ अशा प्रकारे अभिनेत्री सिमरत कौर (Simrat Kaur) हिने तिला इंटिमेट सीनवरुन ट्रोल करणाऱ्या लोकांना उत्तर दिले आहे. ‘गदर 2’ चित्रपटामध्ये मुस्कान हे पात्र साकारणार आहे. बहुचर्चित हा चित्रपट येत्या 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या (Gadar 2 Release Date) भेटीस येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोथरूड परिसरात तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणार्‍या ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळल्या (Video)