या महिन्याच्या शेवटी लग्नबंधनात अडकरणार नेहा कक्कर ? तिचा भावी पती कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणाईस आपल्या आवाजाची भुरळ घालणारी बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर सध्या पर्सनल लाईफमुळे खूप प्रकाशझोतात आहे. यापूर्वी नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र, दोघे अचानक एकमेकांपासून वेगळे झाले. अनेक प्रयत्न करुन नेहा तिच्या ब्रेकअपच्या दु:खातून सावरली. त्यानंतर ‘इंडियन आयडल ११’ च्या सेटवर परत नेहा उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणसोबत लग्न करणार, असल्याची अफवा पसरली. पण आता पुन्हा एकदा नेहाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

एका इंग्रजी वृत्ताने दिलेल्या बातमीनुसार, नेहा या महिना अखेरीस रोहनप्रीत सिंह याच्यासोबत लग्न करणार आहे. रोहनप्रीत हा ‘इंडियाज् राईझिंग स्टार २’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचं तो फर्स्ट रनरअप होता. त्याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा तो सहभागी झालेला. त्याच रोहनप्रितसोबत नेहा लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

अलीकडेच नेहा आणि रोहनप्रीत एका म्युझिक व्हिडिओत सोबत दिसले होते. तसेच दोघे खूप जुने मित्र आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेहा आणि रोहनप्रीत या महिना अखेरीस दिल्लीत लग्न करु शकतात. याबाबत नेहाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, रोहनप्रीतच्या मॅनेजरने यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आम्ही सुद्धा या लग्नाच्या चर्चा ऐकल्या आहेत. पण नेहा व रोहनप्रीत यांनी अलीकडे एक सिंगल एकत्र केले. कदाचित त्यामुळे त्यांचे नाव जोडले जात असावे. तूर्तास रोहनप्रीतचा लग्नाचा कुठलाही इरादा नाही,’ असे मॅनेजरने स्पष्ट केले. पण खरंच म्युझिक व्हिडीओमुळे या चर्चा रंगल्या आहेत की नेहा व रोहनप्रीत खरोखरच लग्न करणार, हे लवकरच समोर येईल. सूत्रांनी मात्र लग्नाची खबर पक्की असल्याचे सांगितले.

दोघांच्या पोस्टाची चर्चा
नेहा आणि रोहनप्रीत ‘आजा चल लॉकडाउन विच व्याज कराइए कट होन खरचे,’ या गाण्यात सोबत दिसलेले. नुकतेच नेहाने तिच्या इंस्टास्टोरीवर या पंजाबी गाण्याचे बोल शेअर केले होते. त्यानंतर रोहनप्रीतने देखील नेहासोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये ‘डायमंड द छल्ला’ हे गाणे वाजत होते. या व्हिडिओत रोहन नेहाच्या बोटात अंगठी घालताना दिसला होता.