गायक सोनू निगम म्हणतो, वेश्याव्यवसाय कायदेशीर करा

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

अनेकदा बेधडक वक्तव्य करुन वादाला तोंड फोडणाऱ्या गायक सोनू निगम याने पुन्हा नव्याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशात वेश्या व्यावसाय कायदेशीर करण्याचा सल्ला त्याने यावेळी बोलताना दिला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच उघडकीस आलेल्या शेल्टर होम बलात्कारकांड प्रकरणी रिपब्लिक या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे विधान केलं आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f55ced06-9bd4-11e8-a7b8-414d383251f4′]

पहा नेमकं काय म्हणाला गायक सोनू निगमः

देशात होत असलेल्या अशा प्रकारच्या घटनांसाठी आपली लोकशाही जबाबदार आहे. मुलांना शाळेमध्ये लैंगिक शिक्षण दिले जात नाही. हे या सर्वांमागचे प्रमुख कारण आहे. भारतामध्ये विविध जातीधर्माचे लोक राहतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांचा सामना कसा करायचा याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. मुझफ्फरपूरला जे काही झाले ते या प्रकारांचा एका छोटासा भाग आहे. अशा प्रकारची कित्येक प्रकरणे समोरच येत नाहीत. त्यामुळे सेक्स काय असतो हे शाळेत मुलांना समजावून सांगण्याची गरज आहे. तसेच त्यापासून पुढे काय होऊ शकते हेही सांगितले पाहिजे. तसेच दुसऱ्याच्या शरीराचा सन्मान कसा करावा हे देखील समजावून सांगण्याची गरज आहे.

दरम्यान वेश्याव्यावसाय कायदेशीर करण्याचा सल्ला देत असताना सोनू निगमने नेदरलॅंडचे उदाहरण देखील दिले आहे. दोन दिवसांपूर्वी मी  नेदरलॅंडची राजधानी अॅम्स्टरडॅम येथे होतो. त्या ठिकाणी वेश्याव्यावसाय वैध आहे. एका विशिष्ठ श्रेणीतील महिलांना तिथे वेश्यांचा दर्जा देण्यात आला आहे. मोठे पोलीस पथक किंवा फाैजफाटा यांची तिथे गरज पडत नाही कारण सर्वच गोष्टी सामान्य आहेत. असेही त्याने मुलाखती दरम्यान म्हटले आहे.