Sinhagad Fort | सिंहगडावर प्लास्टिक बंदी! वन विभागाचा निर्णय, ५ जून पासून सुरूवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sinhagad Fort | किल्ले सिंहगडावर ५ जून पासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाने पूर्वनियोजन सुरू केले आहे. यापूर्वी जुन्नर वन विभागाने शिवनेरी किल्ल्यावर प्लास्टिक बंदी लागू केली होती. सिंहगड किल्ल्यावर सध्या प्लास्टिक कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. याबाबत गडप्रेमींनी योग्य उपाययोजना करण्याची मागणी वारंवार केली होती.(Sinhagad Fort)

सिंहगड गडकिल्ल्यावर पुणे शहर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक शनिवार-रविवारी येत असतात. हे पर्यटक सोबतच्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या किल्ल्याच्या परिसरात टाकतात. या कचऱ्याने गडाचे सौंदर्य आणि पावित्र्य धोक्यात येते. या समस्येची दखल घेत आता वन विभाग येत्या ५ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करत आहे.

शिवनेरी किल्ल्यावर प्लास्टिक बंदी लागू केल्याने तिथे चांगला परिणाम दिसत आहे. शिवनेरी किल्ल्यावर प्लास्टिक बंदी लागू करण्यापूर्वी शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे प्लास्टिक बंदीला चांगला प्रतिसाद मिळाला.

अशाच प्रकारे सिंहगड किल्ल्यावर मुबलक प्रमाणात शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध केल्यास प्लास्टिक बंदीला मोठा
हातभार लागू शकतो. त्याबाबत वन विभागाने नियोजन सुरू केले आहे.
त्यामुळे येथे येणाऱ्या पुणेकर पर्यटकांनी गडावर जाताना सोबत प्लास्टिकची बाटली न ठेवता स्टिलची बाटली ठेवावी.
अथवा गडावर उपलब्ध असलेले पाणी प्यावे. कारण गडाच्या पायथ्यापासूनच प्लास्टिक बंदी लागू होणार आहे.
येथे प्लास्टिकच्या बाटल्या जमा करूनच पुढे गडावर जाता येईल.

या प्लास्टिक बंदीबाबत पुणे वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले की,
किल्ले सिंहगडावर आम्ही ५ जून पासून प्लास्टिक बंदी करत आहोत. सध्या गडावर कचरा स्वच्छता मोहिम सुरू आहे.
ती आम्ही नेहमीच करत असतो. पण आता ५ जून रोजी पर्यावरणदिन आहे.
त्यामुळे प्लास्टिक बंदीचे नियोजन करण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास