कामाची गोष्ट ! देशातील कोणत्याही कोपर्‍यात बसून दिल्ली AIIMS च्या डॉक्टरांचा घ्या सल्ला, जाणून घ्या हेल्पलाईन नंबर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशाच्या कोणत्याही कोपर्‍यात बसून तुम्ही दिल्लीच्या एम्स AIIMS आणि सफदरजंगच्या डॉक्टरांकडून कोरोना संसर्ग, ब्लॅक फंगस आणि तिसर्‍या लाटेत मुलांचा कसा बचाव करायचा, याबाबत सल्ला घेऊ शकता. देशातील गावांपर्यंत कोरोना संसर्गाचा योग्यवेळी उपचार पोहचवणे, ब्लॅक फंगस आणि तिसर्‍या लाटेवर मात करण्यासाठी दिल्ली आणि सफदरजंगचे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी एकजुट होऊन पुढे आले आहेत.

Pune Crime News : प्रियकराने लग्न करण्यास केली टाळाटाळ; नैराश्यातून 23 वर्षीय पूर्णा चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगर परिसरातील घटना

 

आपल्या या उपक्रमात त्यांनी एक हेल्पलाईन डेस्क नंबर (7827476983) जारी केला आहे, ज्यामध्ये निशुल्क सल्ला मिळण्याची सुविधा दिली जात आहे. कोरोना रूग्ण कुठेही असो, त्याने कधीही हेल्पलाईन नंबरवर आपल्या रिपोर्टची कॉपी पीडीएफ स्वरूपात व्हॉट्सअप करावी. त्याच्या समस्येवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्यास दिला जाईल.

Coronavirus : चीन नव्हे तर अमेरिकेतून कोरोनाचा फैलाव, ‘ड्रॅगन’चा अमेरिकेवर पलटवार

 

मागील 10 दिवसापासून ही हेल्पलाईन सुरू आहे. कोरोना संक्रमित रूग्ण ज्यांना अगोदरपासून शुगर, पोट आणि हृदयासंबंधी आजार आहेत अशा रूग्णांवर जास्त लक्ष दिले जात आहे. रोज सुमारे 20 पेक्षा जास्त लोक संपर्क करत आहेत. संपर्क करणार्‍यांमध्ये बहुतांश लोक बिहारचे आहेत. कोरोनाशिवाय कॅन्सरग्रस्त लोक सुद्धा मोठ्या संख्येने संपर्क करत आहेत.

अशी काम करते हेल्पलाईन
हेल्पलाईन कोऑर्डिनेट करणारे एम्सचे नर्सिंग ऑफिसर कनिष्क यादव यांच्यानुसार त्यांनी एम्स आणि सफदरजंगच्या डॉक्टरांचे एक पॅनल बनवून व्हॉट्सअपग्रुपवर त्यांना जोडले आहे. एखाद्या रुग्णाचा व्हॉट्सअप मिळाल्यानंतर ते त्याची केस पॅनल समोर ठेवतात.

यानंतर संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडे सल्ला मागतात. गरज पडल्यास अधिक माहिती घेतली जाते किंवा फोनवर संपर्क सुद्धा केला जातो. यानंतर तज्ज्ञांचे मत त्यास पाठवले जाते. आता अनेक सामाजिक संघटना राष्ट्रीय वैद्यकीय संघटना, राजस्थान मित्र मंडळ, अध्यात्म साधना आणि विप्र फाऊंडेशन सुद्धा या हेल्पडेस्कशी जोडले गेले आहे.

Also Read This : 

Pune Crime News : प्रियकराने लग्न करण्यास केली टाळाटाळ; नैराश्यातून 23 वर्षीय पूर्णा चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगर परिसरातील घटना

गरोदरपणात खावीत ‘ही’ फळे ; होतील ‘हे’ खास फायदे

 

Coronavirus : चीन नव्हे तर अमेरिकेतून कोरोनाचा फैलाव, ‘ड्रॅगन’चा अमेरिकेवर पलटवार

 

उन्हाळ्यात ब्लड प्रेशर सांभाळा

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

केस दाट, लांब, मजबूत होण्यासाठी ‘हे’ करा !