भोरमध्ये 6 दिवसाचा कडक Lockdown !

भोर : पोलीसनामा ऑनलाइन –  भोर शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने आज शुक्रवार (दि. 7) पासून बुधवारी (दि. 12) रात्री 12 वाजेपर्यंत शहरात 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात शहरातील आरोग्यसेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

भोर तालुक्यातील नगरपालिका हद्दीत आणि ग्रामीण भागात ज्या गावात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. तसेच ज्या ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याठिकाणचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने भोर नगरपालिका क्षेत्रामध्ये शुक्रवारी (दि. 7) ते बुधवारी (दि. 12) रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे. या काळात फक्त रुग्णालय सुविधा, औषधे दुकान सुरु राहणार आहेत. सकाळी 7 ते 9 या कालावधीत दूध वितरण सेवा चालू राहील. भाजीपाला फळे किराणासह सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत. दरम्यान 5 दिवसाचे लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सदर कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणा पोलिस यंत्रणा निर्देश दिले आहेत.