6 तासांपेक्षा कमी झोपणार्‍यांना होऊ शकतो मानसिक आजार, 35 वर्षांच्या रिसर्चनंतर शास्त्रज्ञांनी केला खुलासा

लंडन : कमी झोपणार्‍यांनी आता जास्त वेळ झोपण्यास सुरूवात करावी कारण जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर झोपसुद्धा आवश्यक आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी रिसर्चनंतर रिपोर्ट पब्लिश केला आहे की कमी झोपणार्‍या लोकांना मानसिक आजार होऊ शकतात. वेड लागण्याची शक्यता सुद्धा वाढते. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 6 तासांपेक्षा कमी झोपणारे लोक मानसिकदृष्ट्या विक्षिप्त होऊ शकतात.

50 वर्षाच्या वयापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी 6 तासापेक्षा कमी झोपणे धोकादायक ठरू शकते. त्यांना वेड लागू शकते. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी 35 वर्षापर्यंत सुमारे 8 हजारपेक्षा जास्त ब्रिटीश नागरिकांवर रिसर्च केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे की, कमी झोपणारे लोक वेडे होण्याची शक्यता जास्त आहे. रिसर्च प्रसिद्ध करणार्‍या शास्त्रज्ञांनी सांगितले की, 35 वर्षापर्यंत 8 हजार लोकांवर रिसर्च करण्यात आला आणि आकडे कॅलक्युलेट केल्यानंतर 6 तासांपेक्षा कमी झोपणार्‍या लोकांना वेडे होण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले. मात्र, शास्त्रज्ञांनी म्हटले की, यापाठीमागील कारण शोधण्यात त्यांना अपयश आले.

नेचर कम्युनिकेशन प्रकाशित झाला रिपोर्ट
मंगळवारी ब्रिटिश मेडिकल जनरल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार 6 तासापेक्षा कमी झोपणार्‍या लोकांना डिमेंशिया नावाचा आजार होऊ शकतो. डिमेंशिया एक मेंदूचा आजार आहे, ज्यामुळे रूग्ण अनेक मानसिक आजारने पीडित होतो. ज्यामध्ये विस्मरण, अल्जायमर, बोलण्याची क्षमता कमी होणे, चिडचिडेपणा, निर्णय घेण्यात चूक, व्यक्तीमत्वात बदलासह अनेक प्रकारच्या आजरांचा समावेश आहे. विशेषकरून 50 वर्ष किंवा 60 वर्षाचे जे लोक 6 तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना डिमेंशिया होण्याचा धोका खुप जास्त असतो.